Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Tulsi Vivah 2022 Muhurat तुळशी विवाह शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Tulsi Vivah 2022 Muhurat तुळशी विवाह शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
, गुरूवार, 3 नोव्हेंबर 2022 (22:51 IST)
Tulsi Vivah 2022 हिन्दू पंचांगानुसार कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. हिन्दू धर्मात तुळस अत्यंत पवित्र, पूजनीय आणि आईसारखी मानली जाते. तुळशीची पूजा केल्याने, तुळसला नियमित जल अर्पित केल्याने देवी लक्ष्मीची कृपा राहते असेही म्हणतात. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी. अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो.
 
यंदा 4 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी असून तुळशी विवाहाचे मुहूर्त हे 5 नोव्हेंबर पासून प्रारंभ होऊन 8 नोव्हेंबरपर्यंत आहेत.
कार्तिक शुक्ल द्वादशीपासून तुळशी विवाह सुरु होतात. यंदा 5 नोव्हेंबर शनिवारपासून ते 8 नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमा या तिथीपर्यंत विवाहाचे मुहूर्त आहे.
 
कार्तिक द्वादशी तिथी प्रारंभ - शनिवार 05 नोव्हेंबर 2022 संध्याकाळी 06:08 पासून
कार्तिक द्वादशी तिथी समाप्त- रविवार 06 नोव्हेंबर 2022 संध्याकाळी 05:06 पर्यंत
 
उदया तिथीप्रमाणे तुळशी विवाह सण 6 नोव्हेंबर रोजी असला तरी शुक्र अस्त होत असल्याने 5 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाईल.
 
तुळशी विवाह या दिवशी तुळशीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह करण्याची प्रथा आहे. भगवान विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे तसेच तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते.
 
तुळशी विवाह पद्धत
घरातीलच कन्या मानून तुळशी विवाह लावतात.
या दिवशी घरातील तुळशी वृंदावनाची किंवा तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची रंगरंगोटी करावी, त्याची सजावट करावी.
मांडव म्हणून उसाची वा धांड्याची खोपटी ठेवावी.
यावर बोर, चिंच, आवळा, सिताफळ, कांद्याची पात ठेवावी. 
स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करावी. 
त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालावे. 
तुळशीला नवीन वस्त्र अर्पित करावे.
विष्णूला जागे करुन बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून विवाह लावून द्यावा.
तुळशीचे कन्यादान करावे.
मंत्रपुष्प आणि आरती करावी.
या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Prabodhini Ekadash प्रबोधिनी एकादशी, या दिवसापासून वाजणार शहनाई