Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

आपकडून ७० जागांवर आपले उमेदवार जाहीर

AAp will announce your candidature in 4 seats
दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी आम आदमी पार्टीने (आप)  सर्व ७० जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यांपैकी नवी दिल्ली मतदारसंघातून स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तर पटपडगंज येथून उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे निवडणूक लढवणार आहेत. 
 
उमेदवारांच्या नावांची यादी अंतिम करण्यासाठी आपकडूनपॉलिटिकल अफेअर्स समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अंतिम यादीवर शिक्कामोर्तब झाला. 
 
दरम्यान, माध्यमांशी बोलताना मनिष सिसोदिया म्हणाले, बैठकीत ४६ विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर ९ जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच १५ जागांवर विद्यामान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यंदा ६ महिलांना ऐवजी ८ महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. तसेच ६ रिक्त जागांवरही नव्या लोकांना संधी देण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रस्ते अपघातामध्ये मुख्यमंत्री यांच्या मेव्हणी जखमी,एक जण ठार