Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजपला मत म्हणजे प्रत्येक मोफत सेवेच्या विरोधात मत - सिसोदिया

भाजपला मत म्हणजे प्रत्येक मोफत सेवेच्या विरोधात मत - सिसोदिया
नवी दिल्ली , सोमवार, 13 जानेवारी 2020 (16:50 IST)
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचरारचे वातावरण आता तापू लागले आहे. आम आदमी पक्षाच्यावतीने 
बोलताना उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी म्हटले आहे की या निवडणुकीत भाजपला एक जरी मत दिले 
गेले तरी ते मत म्हणजे राज्यात सुरू करण्यात आलेल्या मोफत वीज, मोफत आरोग्य व शिक्षण व्यवस्थेच्या विरोधातील मत असेल. त्यामुळे मतदान करताना प्रत्येक नागरीकाने हा विचार करूनच मतदान करावे. 
 
दिल्लीतील जनतेला मोफत खोर जनता असे संबोधून भाजपने दिल्लीतील नागरीकांचा अवमान केला आहे. 
त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. नागरीकांना स्वस्तात किंवा मोफत 
स्वरूपात सोयी सुविधा पुरवणे हे प्रत्येक राज्याचे कर्तव्य आहे. आमच्या सरकारने हे कर्तव्य पार पाडले आहे 
असा दावाही त्यांनी केला. 
 
लोकांना अशा मोफत सुविधा देण्यास भाजपचा विरोध आहे असे ते म्हणाले. ही त्यांची राजकीय भूमिका असू शकेल पण त्यासाठी त्यांनी दिल्लीतील जनतेला फुकटेगीरी म्हणणे योग्य नही असे सिसोदिया यांनी यावेळी भाजपला बजावले. आमच्या योजनांना विरोध करून भाजपचे लोक जनतेलाच विरोध करीत आहेत असा दावाहीं त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाडिया कर्मचाऱ्याच्या आंदोलनात मनसेची उडी