Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 5 April 2025
webdunia

दिल्ली विधानसभा, 'आप'चे 67 जागांचे लक्ष्य

Delhi Assembly
नवी दिल्ली , सोमवार, 23 डिसेंबर 2019 (15:48 IST)
आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आमदी पक्षाने 67पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवावे, असे आवाहन दिललीचे मुख्यमं‍त्री आणि 'आप'चे राष्ट्रीय नियंत्रक अरविंद केजरीवाल यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले. 'आप'च्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरावे, असे ते म्हणाले.
 
दिल्ली हा 'आप'चा बालेकिल्ला आहे, येथूनच पक्षाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे पक्षाने येथे पूर्ण ताकदीने लढले पाहिजे, असे केजरीवाल यांनी सांगितले. गेल्या निवडणुकीत आपण 70 पैकी 67 जागा जिंकल्या. या वेळेस त्या कमी न होता वाढल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगताच कार्यकर्त्यांनी 70 पैकी 70 अशी घोषणाबाजी केली. भाजपने हरियाणामध्ये जाट आणि इतर उर्वरित देशात हिंदू-मुस्लीम असे राजकारण केले. मात्र, दिल्लीमध्ये भाजपला फक्त विकासावरच बोलण्यास आम्ही भाग पाडले आहे, असेही केजरीवाल म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागरिकत्व कायदा धर्म, जातीच्या विरोधात नाही