लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. निकालानंतर राज्यात देखील मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदावरून राजीनामा देण्याची इच्छा दर्शवली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री कोण असणार उपमुख्यमंत्री पदावर गिरीश महाजन यांची वर्णी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. फडणवीस यांना भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी द्यायची माहिती मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली असून त्यांनी पदावरून राजीनामा देण्याची इच्छा वर्तवली असून भाजपतील इतर नेते यांनी त्यांची मनधरणी करत त्यांना राजीनामा माघारी घेण्याचे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री कोण होणार तसेच गृहमंत्रीचे खाते कोणाला मिळणार असे प्रश्न उदभवत असताना भाजपचे नेते गिरीश महाजन हे महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात असून तशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गिरीश महाजन हे फडणवीसांचे जवळचे आणि विश्वासू नेते मानले जातात आता यावर काय निर्णय घेतले जातात या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.