दिवाळी स्पेशल : मुगाच्या डाळीचे लाडू

साहित्य - मुगाची डाळ धुतलेली 1 कप, भुरा साखर - 1 1/2 कप, तूप - 1 कप, बदाम - 1/4 कप, काजू - 1/4 कप, वेलची पूड - 1/2 चमचा, पिस्ता - 8-10. 
 
विधी - सर्वप्रथम मुगाच्या डाळीला स्वच्छ धुऊन 3-4 तास पाण्यात भिजवून ठेवा. नंतर डाळीतील पाणी काढून मिक्सरमधून रवाळ दळून घ्या.    
 
बदामाला मिक्सरमधून काढून त्याची पूड तयार करा, काजूचे लहान लहान काप करा. याच प्रमाणे पिस्त्याचे बारीक बारीक काप करा. 
 
आता कढईत तूप घालून रवाळ पीठ भाजून घ्या. व एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्या. जेव्हा हे पीठ थंड होईल तेव्हा त्यात साखरेचा बुरा आणि सर्व प्रकारचे ड्राय फ्रूट्स घालून मिक्स करा. आता या मिश्रणाचे लाडू बांधा आणि त्यावर पिस्त्याने गार्निश करा.  
 
भुरा साखर तयार करण्याची विधी : दीड कप साखर व 1 कप पाण्याचा पाक करत ठेवा. 2 थेंब लिंबाचा रस व 1 चमचा तूप घाला. पाक पक्का झाल्यावर गॅस बंद करा. ही साखर मिक्सरमध्ये दळून वापरा. या साखरेमुळे लाडू खमंग लागतो. 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख स्मार्ट टिप्स?