Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्मार्ट टिप्स?

स्मार्ट टिप्स?
साबणाचे तुकडे उरले तर एखाद्या नायलॉनच्या जाळीदार पिशवीत घालून बेसिनपाशी लटकवून ठेवावे. हात धुण्यासाठी त्याचा चांगला वापर होतो.
 
कॉटन शूज किंवा कोणत्याही प्रकारची पादत्राणं ओली झाल्यास त्यात कागदाचे बोळे भरून ठेवावेत. यामुळे ती लवकर कोरडी होतात. 
 
परफ्यूमची बाटली संपल्यावर टाकून न देता सील उघडून बाथरूममध्ये ठेवावी. यामुळे मंद सुगंध दरवळत राहतो.
 
संत्र्याच्या साली वाळवून अधूनमधून घरामध्ये जाळल्यास डासांचा त्रास कमी होतो.
 
सिगारेटच्या धुराचा वास घरामध्ये भरून राहू नये यासाठी अँश-ट्रेमध्ये थोडीशी बेकिंग पावडर घालून ठेवावी.
 
काकडीची सालं चांगली कुडकुडीत होईपर्यंत वाळवावी आणि पुरचुंडी करून कपाटात ठेवावी यामुळे झुरळं आणि मुंग्यांचा त्रास कमी होतो.
 
थब्रश अधूनमधून मिठाच्या पाण्यात घालून ठेवावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिवाळीत वाढू शकतं वजन, जाणून घ्या 10 उपाय