दिवाळी म्हणजे खूप पक्वान्न आणि गोड-धोड. या पाच दिवसात डायटिंग राहते बाजूला आणि आपोआप चकली, करंजी, शंकरपाळे, शेव सहजच तोंडाचा धाव घेतात. अशात कॅलरीज वाढणं तर साहजिकच आहे. म्हणूनच खाण्यावर कंट्रोल करण्याची गरज नाही परंतू यानंतर वजन नियंत्रित करण्यासाठी जाणून घ्या 10 सोपे उपाय:
* सामान्य दिवसांमध्ये आपल्या डायटवर लक्ष द्या. आपण खात असलेले पदार्थ कमी कॅलरीयुक्त आहे याची काळजी घ्या. अधिक फॅट्स आणि कॅलरीज असलेल्या पदार्थाने एनर्जी मिळत असली तरी ते पदार्थ टाळा.
* फळ आणि भाज्यावर फोकस करा. ज्यूस, सूप आणि सलाड सर्वोत्तम पर्याय आहे. हे सर्व आपल्या एनर्जी देते आणि शरीरातून हानिकारक तत्त्व बाहेर फेकून पचन तंत्र सुरळीत करतील.
* जेवताना तेल आणि तूप टाळा. शक्य नसल्यास त्याची मात्रा तरी कमी करा.
* दिवसभरात कमीत कमी 3 लीटर पाणी प्या. हवं असल्या लिंबू पिळून पाणी प्या. याने स्वादही वाढेल आणि आरोग्यासाठी तर हे उत्तम आहेच.
* गोड पदार्थांपासून दूरच राहा. पेय पदार्थांमध्येही साखर टाळा किंवा कमी मात्रेत सेवन करा.
* सकाळी नाश्ता भरपूर घेतला तरी चालेल परंतू डिनर लाइट असले पाहिजे. डिनर नेहमीपेक्षा लवकर घेण्याचा प्रयत्न करा.
* दिवसातून दोन ते तीन वेळा ग्रीन टी प्या. याने शरीर हलकं जाणवेल आणि एनर्जी राहील. ताणापासूनही मुक्ती मिळेल.
* दिवसभर एकाच जागी बसून राहू नका. अधून-मधून चालत-फिरत राहा. सकाळ- संध्याकाळ फिरणे फायदेशीर राहील. बाहेर जाणं शक्य नसल्या गच्चीवर किंवा अंगणातही फिरू शकता.
* व्यायाम करणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम केल्याने वजन लवकर नियंत्रित होईल. व्यायाम करण्याचा कंटाळा असेल तर घरीच दोरीवरच्या उड्या मारणे किंवा लहान मुलांसोबत खेळण्यानेही काम बनेल.
* जेवल्यानंतर (किमान अर्ध्या तासानंतर) कोमट पाणी प्या. याने पचन तंत्र सुरळीत होईल आणि पोटावरील चरबी कमी होईल.