Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिवाळी स्पेशल : गुळाचे शंकरपाळे

दिवाळी स्पेशल : गुळाचे शंकरपाळे
साहित्य - 3 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी डाळीचं पीठ, सवा वाटी किसलेला गूळ, अर्धी वाटी तुपाचं मोहन, चिमूटभर मीठ आणि तळायला तूप किंवा तेल.
 
कृती- अर्धी वाटी पाण्यात गूळ, तूप व मीठ घालून उकळावं. गार झाल्यावर त्यात गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ घालून पीठ घट्ट भिजवावं. एक तासानं मोठे गोळे करुन पोळी लाटून शंकरपाळे कापून घ्यावे. तूप किंवा गरम करुन मंद आचेवर शंकरपाळे तळावे. शंकरपाळे थंड झाल्यावरच डब्यात भरावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरगुती उपाय : अवश्य करून पाहावे