Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 13 April 2025
webdunia

दिवाळी विशेष पदार्थ :चविष्ट बेसन लाडू

Diwali Special: Delicious Besan Laddu Delicious special BesanLadoo recipe in marathi दिवाळी विशेष पदार्थ :चविष्ट बेसन लाडू रेसिपी इन मराठी वेबदुनिया मराठी DiwaliRecipe Marathi Webdunia Marathi
, सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (13:54 IST)
सणासुदीच्या दिवसात गोडधोड बनतोच, या दिवाळीच्या फराळात बेसनाच्या लाडूचे महत्त्व आहे, बेसनाचे लाडू सर्वानाच आवडणारा पदार्थ आहे. चला तर मग बेसनाचे लाडू बनविण्याची सोपी पद्दत जाणून घेऊ या. 
 
साहित्य : 
1 वाटी जाड बेसन, 2-3 चमचे साजूक तूप, एक वाटी पिठी साखर, 1 टीस्पून वेलची पूड, ड्रायफ्रुट्सचे काप (आवडीनुसार), चांदीचा वर्ख (इच्छानुसार).
 
कृती : 
सर्वप्रथम 1 वाटी जाड बेसन 2 मिनिटे भाजून घ्या. सतत हलवत रहा. आता त्यात 2-3 चमचे तूप टाका आणि बेसन हलके तपकिरी होईपर्यंत सतत ढवळत राहा. जेणे करून ते जळणार नाही म्हणून मधेच काळजी घ्या. हे सुमारे 7-8 मिनिटे मायक्रोवेव्ह मध्ये करा. आता बेसन बाहेर काढून थंड होऊ द्या. आपण कमी-जास्त तूप आणि साखर घालू शकता.
 
आता बेसनात पिठी साखर, वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स मिसळा आणि मधून मधून  ढवळत राहा, थंड झाल्यावर छोटे लाडू बनवा आणि इच्छानुसार चांदीच्या वर्कने सजवा. लक्षात ठेवा की मायक्रोवेव्ह फक्त बेसन भाजण्यासाठी वापरायचे आहे. उर्वरित पद्धत मायक्रोवेव्हच्या बाहेर करा.
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Rajasthan Police Constable Recruitment राजस्थान पोलिसांमध्ये बंपर रिक्त जागा, ३ डिसेंबरपूर्वी अर्ज करा