Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कुरकुरीत चकली कशी बनवायची

कुरकुरीत चकली कशी बनवायची
कुरकुरीत चकल्यांसाठी या टिप्स लक्षात ठेवा
 
चकलीसाठी लागणारं पीठ थोडे वाफवून घेतले की चकली कुरकुरीत होते. 
 
साच्यामध्ये चकली बनवत असताना सारखी तुटत असेल तर पिठात थोडं पाणी आणि तेल घालून व्यवस्थित मळून घ्यावं. 
 
चकल्या तळताना तेल पूर्णपणे गरम होऊ द्यावं. चकल्या तेलात सोडताना आच मोठी असावी नंतर  साधारण १ मिनिटानंतर गॅस मंद करावा चकली लालसर होईपर्यंत तळावी.
 
चकली कुरकुरीत होण्यासाठी पिठात गरम करून मोहन टाकावं. पिठात बेताचं मोहन असावं तरी मोहन जास्त झाल्यास तेल न घालता थोडी भाजणीची उकड काढावी आणि आधी मळलेल्या पिठाचा थोडा भाग घेऊन त्यात मिसळून घ्यावं. 
 
चकली भाजणीची उकड गार पाण्याने मळल्यास  चकली बिघडण्याची शक्यता असते. भाजणीची उकड मळताना नेहमी कोमट किंवा गरम पाण्याने मळावी.
 
चकली करण्याची कृती
चकलीच्या भाजणीचे साहित्य : 
जाड तांदूळ -1 किलो
अर्धा किलो चणाडाळ
50 ग्रॅम उडीद डाळ
200 ग्रॅम मूग डाळ
100 ग्रॅम साबुदाणे
100 ग्रॅम पोहे
25 ग्रॅम जीरे
25 ग्रॅम धणे
 
कृती : तांदूळ, डाळी व इतर साहित्य निवडून, धुवून पूर्णपणे निथळून घ्यावे. सुती कापडवर पसरून दिवसभर खडखडीत वाळवून घ्यावे. प्रत्येक डाळी मध्यम आचेवर भाजून घ्या. तांदूळदेखील भाजून घ्या. तसेच पोहेदेखील भाजून घ्या. खमंग भाजावे पण करपत नाहीये याची काळजी घ्यावी.
 
तसेच मध्यम आचेवर साबुदाणा फुलेपर्यंत भाजा. जिरे आणि धणेसुद्धा भाजून घ्या. भाजलेले सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर गिरणीतून दळून घ्या.
 
चकली बनवण्यासाठी कृती : चकलीचे पीठ चालून घ्या. जितकं हवं तितकंच पीठ घ्या. एकदम पीठ न मळता थोडेथोड पीठ मळून चकल्या बनवा. पिठात आपल्या चवीप्रमाणे मीठ, तिखट टाका. अंदाजे 2 वाटी भाजणीच्या पिठात 1 चमचा तिखट, 2 चमचे तीळ, 3 चमचे कडलेले तेल, 1 वाटी पाणी, 1 चमचा मीठ घालून मळून घ्या.
 
चकलीच्या सो‍च्याला आतून तेल लावा. नंतर एक पीठाचा गोळा करून साच्यामध्ये घाला आणि एका तेल लावलेल्या भांड्यात चकल्या पाडून घ्या.
 
गॅसवर एका कढईत तळण्यासाठीचं तेल चांगलं गरम करून घ्या. हळू हळू चकली सोडा. एकदम खूप चकल्या सोडू नका. चकल्यांचा रंग बदलू लागेल तसेच चकल्यांच्या भोवती बुडबुडे बंद होऊ लागल्यावर कढईतून चकल्या काढून घ्या आणि कागद्यावर पसरवून घ्या. खमंग आणि कुरकुरीत चकल्या तयार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

SBI Recruitment 2022: स्टेट बँकेत नोकरीची संधी, त्वरा अर्ज करा