साहित्य : चण्याची डाळ चार वाट्या, साखर साडेतीन वाट्या, एक नारळ, दोन वाट्या तूप, एक वाटी दूध, दहा ग्रॅम
बेदाणा, पाच-सहा बदाम, दहा-पंधरा बेलदोडे, अर्धा ग्रॅम केशर किंवा खाण्याचा केशरी रंग.
कृती : प्रथम डाळ चार ते पाच तास पाण्यात भिजत घालून ठेवावी. नंतर स्वच्छ धुऊन पाट्यावर रवाळ वाटून घ्यावी. नंतर ती वाटलेली डाळ तुपामध्ये चांगली तांबूस होईपर्यंत भाजावी. साखरेचा दोन-तारी पाक करून त्यात तो भाजलेल्या डाळीचा रवा व इतर साहित्य घालावे. हे मिश्रण तसेच ठेवून द्यावे. अर्ध्या-पाऊस तासाच्या अंतराने वरचेवर खालीवर करावे व वर तूप आल्यास ओतून काढावे. सकाळी केल्यास संध्याकाळी लाडू वळता येतील.