Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शंकरपाळी खुसखुशीत बनत नाही? तर नक्की वाचा खास टिप्स

shakarpare
, रविवार, 9 ऑक्टोबर 2022 (12:20 IST)
शंकरपाळी सर्वात आवडता पदार्थ आहे. कारण चहा पिताना किंवा जरा काही तोंडात टाकण्याची इच्छा असताना शंकरपाळी खाणे सर्वांनाच आवडतं. मात्र घरी शंकरपाळी बनवताना अनेकदा प्रश्न पडतो की ते बाजारात मिळणार्‍या खस्ता कुरकुरीत शंकपार्‍यांसारखे कसे बनवायचे? चला तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत ज्याने आपले शंकरपाळी देखील क्रिस्पी बनतील-
 
शंकरपाळी बनवण्यासाठी मैद्यामध्ये मोयन नक्की घाला पण लक्षात ठेवा की तेलाचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त असू नये.
 
खारे शंकरपाळी तयार करताना मैद्यामध्ये जिरे किंवा ओवा टाकल्याने त्याची चव वाढते.
 
मिठाचे प्रमाण योग्य असावे कारण जास्त मिठामुळे चव खराब होते.
 
शंकरपाळीसाठी पीठ मळून घेण्यासाठी नेहमी कोमट पाणी वापरावं. 
 
मैद्यामध्ये जरासा रवा मिसळल्याने देखील कुरकुरीतपणा येतो.
 
शंकरपाळी फक्त मंद आचेवर तळावे. अन्यथा ते वरून सोनेरी झाले तरी आतून कच्चे राहतात आणि नरम पडतात.
 
आपण इच्छित असल्यास बेकिंग पावडर देखील वापरू शकता.
 
कसूरी मेथीमुळे चव आणखी चांगली होते.
 
शंकरपाळी बनविण्यासी कृती
एक बॉउलमध्ये समप्रमाणात मैदा, तेल आणि पाणी घ्या. खारे शंकपाळी बनविण्यासाठी त्यात चवीप्रमाणे मीठ आणि ओवा घाला.
गोड शंकरपाळी करण्यासाठी मैद्याच्या अर्ध्या प्रमाणात सारख घ्या.
आता यात कोमट पाणी घालून पीठ मळून घ्या आणि 20 मिनिटांसाठी तसंच राहू द्या.
आता याची मोठी-मोठी लोई तयार करा आणि पोलपाटावर जाड पराठ्‍यासारखं लाटून घ्या.
आता चाकूच्या मदतीने आपल्या आवडीच्या आकाराचे छोटे- छोटे तुकडे करा.
आता कढईत तेल टाकून मध्यम आचेवर तळून घ्या.
गार झाल्यावर एयर टाइट कन्टेनरमध्ये भरुन ठेवून घ्या.
चहा-कॉफी सोबत सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Home Remedies To Delay Periods Without Pills: औषध न घेता मासिक पाळीची तारीख वाढवण्यासाठी घरगुती उपाय अवलंबवा