rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Green Tea Recipe ग्रीन टी कसा बनवायचा जाणून घ्या

Green Tea
, बुधवार, 14 मे 2025 (12:11 IST)
साहित्य-
पाणी-एक कप
हिरवी वेलची- एक  
तुळशीची पाने-सहा
आले- एक इंच किसलेले
पुदिन्याची पाने-दहा
लिंबाचा रस-एक टीस्पून
मध-तीन चमचे
ALSO READ: मसाला चहा कसा बनवावा? जाणून घ्या रेसिपी
कृती-
सर्वात आधी तुळस आणि पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून घ्या. आता एका पॅनमध्ये दोन कप पाणी, किसलेले आले आणि हिरवी वेलची घाला. आता गॅसवर पॅन ठेऊन त्यामध्ये पाणी उकळी येईपर्यंत गरम करा. पाणी उकळायला लागल्यावर ते पाच  मिनिटे मोठ्या आचेवर शिजवा जेणेकरून वेलची आणि आल्याची चव पूर्णपणे पाण्यात मिसळेल.पाच मिनिटे उकळल्याने पाण्याचे प्रमाणही कमी होईल. आता गॅस बंद करा आणि पॅनमध्ये तुळस आणि पुदिन्याची पाने घाला आणि झाकून ठेवा. साधारण पाच मिनिटांनी झाकण काढा, असे केल्याने ग्रीन टीला तुळस आणि पुदिन्याच्या पानांचा स्वाद येतो. आता एका कपमध्ये ग्रीन टी गाळून घ्या आणि त्यात मध आणि लिंबाचा रस घाला. ग्रीन टी तयार आहे, आता तुम्ही तो सेवन करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Green apple juice आरोग्यवर्धक हिरव्या सफरचंदाचे ज्यूस
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

International Day of Families Wishes in Marathi जागतिक कुटुंब दिनाच्या शुभेच्छा