साहित्य : 15-16 स्ट्रॉबेरीज, तांदूळ 4 चमचे, दूध 5 कप, 3/4 कप साखर, 1/2 चमचा वेलची पावडर, 10-12 पिस्ता काप केलेले, 8 -10 बदाम काप केलेले.
कृती : सर्वप्रथम तांदुळाला स्वच्छ धुऊन कोरडे करून त्याचे पेस्ट तयार करावी. त्यात जरा पाणी घालून एकजीव करावे. दुधाला उकळून त्यात तांदळाची पेस्ट घालावी. 3-4 मिनिट उकळू द्यावे. साखर, वेलची पूड आणि साखर घालून चांगले ढवळावे. नंतर भांड गॅसवरून खाली उतरवून घ्यावे. थंड झाल्यावर त्यात कापलेल्या स्ट्रॉबेरी घालाव्या, आता त्यात पिस्ते, बदामाने सजवून थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवावे नंतर गार सर्व्ह करावे.