यावर्षी दसरा म्हणजेच विजयादशमी 24 ऑक्टोबरला आहे. असे मानले जाते की त्रेतायुगात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी भगवान श्रीरामांनी लंकापती रावणाचा वध करून माता सीतेला त्याच्या तावडीतून मुक्त केले होते. तेव्हापासून दरवर्षी या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा संदेश देतो.
एका मान्यतेनुसार या दिवशी नीळकंठ पक्षी पाहणे देखील खूप शुभ असते. दसऱ्याच्या दिवशी नीळकंठ पक्ष्याचे दर्शन घेतल्याने तुमची सर्व वाईट कामे सुधारून जीवनात सुख-समृद्धी येते, असे म्हणतात. अशा परिस्थितीत, दसऱ्याच्या दिवशी नीळकंठचे दर्शन घेणे का शुभ मानले जाते आणि याच्याशी संबंधित पौराणिक मान्यता काय आहे हे जाणून घेऊया.
नीळकंठ पक्षी पाहण्याचे महत्त्व :
हिंदू धर्मात नीळकंठ पक्षी अतिशय शुभ मानले जाते. दसऱ्याच्या दिवशी पाहिल्यास धन-संपत्ती वाढते. असे मानले जाते की दसऱ्याच्या दिवशी कधीही नीळकंठ पक्षी दिसल्यास घरात सुख-समृद्धी येते आणि जे काम तुम्ही करणार आहात त्यात यश मिळते.
दसऱ्याला नीळकंठचे दर्शन घेणे शुभ का?
पौराणिक मान्यतेनुसार, भगवान श्रीराम रावणाचा वध करण्यासाठी जात असताना त्यांना नीळकंठ पक्षी दिसला. यानंतर भगवान श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला. याशिवाय रावणाचा वध केल्यानंतर ब्राह्मणाच्या वधाचे पाप भगवान रामाला झाले होते, असे सांगितले जाते. त्या पापापासून मुक्ती मिळावी म्हणून भगवान श्रीरामांनी शिवाची पूजा केली होती. असे मानले जाते की या पापातून श्रीरामाला मुक्त करण्यासाठी भगवान शिव नीलकंठ पक्ष्याच्या रूपात प्रकट झाले होते. तेव्हापासून दसऱ्याच्या दिवशी नीळकंठाचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. या दिवशी नीळकंठाचे दर्शन घेणे शुभ मानले जाते.
नीळकंठ पक्षी पाहता या मंत्राचा जप करा -
कृत्वा नीराजनं राजा बालवृद्धयं यता बलम्।
शोभनम खंजनं पश्येज्जलगोगोष्ठसंनिघौ।।
नीलग्रीव शुभग्रीव सर्वकामफलप्रद।
पृथ्वियामवतीर्णोसि खच्चरीट नमोस्तुते।।
नीळकंठ म्हणजे काय-
नीळकंठ म्हणजे ज्याचा कंठ निळा आहे. धार्मिक शास्त्रानुसार भगवान शिव हे नीळकंठ आहेत. या कारणास्तव, हा पक्षी भगवान शंकराचा प्रतिनिधी आणि रूप दोन्ही मानला जातो. दसऱ्याच्या दिवशी भगवान शिव नीळकंठ पक्ष्याच्या रूपात फिरतात, अशी श्रद्धा आहे. अशा स्थितीत दसऱ्याच्या दिवशी एखाद्या व्यक्तीने नीळकंठ पाहिले तर ते शुभ मानले जाते.