Dussehra upay: यंदा विजयादशमी हा सण 12 ऑक्टोबर 2024 शनिवार रोजी साजरा केला जाणार आहे. या रात्री 5 अचूक उपाय केल्याने सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल.
1. धन-समृद्धीसाठी उपाय: मान्यतेनुसार, दसऱ्याच्या रात्री रावण दहन केल्यानंतर गुप्त दान करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे आर्थिक संकट दूर होऊन शुभता वाढते. याशिवाय दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीचे ध्यान करताना मंदिरात झाडू दान केल्याने धन-समृद्धी वाढते. तुमची इच्छा असल्यास दसऱ्याच्या दिवसापासून सलग 43 दिवस कुत्र्याला बेसनाचे लाडूही खाऊ शकता. यामुळे तुमच्या पैशाशी संबंधित समस्या दूर होतील.
2. नकारात्मकता दूर करण्यासाठी उपाय: दसऱ्याच्या दिवशी तुरटीचा तुकडा कुटुंबातील सर्व सदस्यांवरुन ओवाळून टेरेसवर किंवा निर्जन ठिकाणी फेकून द्या आणि तुमच्या प्रमुख देवतेचे ध्यान करा. असे मानले जाते की असे केल्याने घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
3. संकटापसून मुक्तीसाठी उपाय: दसर्याला सुंदरकांड कथा केल्याने सर्व रोग आणि मानसिक त्रासापासून मुक्ती मिळते. विधिवत रूपात सुंदरकांड पाठ करुन हनुमानाची आरती करावी आणि प्रसाद वाटप करावा.
4. कोर्ट-कचेरीपासून मुक्तीसाठी उपाय: दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाखाली दिवा लावल्याने सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. शमीच्या झाडाखाली दिवा लावल्याने सौभाग्य प्राप्त होते.
5. आरोग्यासाठी उपाय: आजार किंवा संकट दूर करण्यासाठी एक अख्खं पाणी असलेले नारळ घेऊन स्वत:वरुन 21 वेळा ओवाळून रावण दहनाच्या आगीत टाकून द्यावे. असे घरातील प्रत्येक सदस्यांवरुन ओवाळून टाकू शकता.