Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मकर संक्रांतीलाच पतंगने घेतला चिमुकल्याचा बळी

webdunia
शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (21:03 IST)
मकरसंक्रांत निमित्‍ताने पतंगोत्‍सवाचा आनंद मोठ्यांसह चिमुकले देखील घेत असतात. सकाळपासून मोकळ्या मैदानात पतंग उडवित असल्‍याचा आनंद क्षणात शांत झाला. दहा वर्षीय मुलाच्‍या मृत्‍यूने कुटूंबावरच दुःखाची संक्रांत ओढवली. हितेश ओंकार पाटील (वय १०) असे मृत मुलाचे नाव आहे.
 
पतंग उडवत असताना दहा वर्षीय मुलाचा विजेच्या तारेला धक्‍का लागल्यामुळे मृत्यू झाला. जळगाव शहरापासून जवळ असलेल्‍या कुसुंबा गावात सदर घटना घडली. सदरची दुर्दैवी घटना आज दुपारी बाराच्‍या सुमारास घडली. यामुळे गावांमध्ये दुःखच वातावरण निर्माण झालं आहे.
 
हितेश मित्रांसोबत मोकळ्या मैदानात पतंग उडवायला गेला होता. पतंग उडवीत असताना विजेच्या तारांमध्ये अडकला. हा पतंग काढण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला विजेच्या तारेचा शॉक लागला. हा प्रकार घडल्‍यानंतर ग्रामस्थांनी त्यास तात्‍काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल कळसकर यांनी त्यास मृत घोषित केले.
 

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

Vivo Pro Kabaddi:जयपूर पिंक पँथर्स Vs पटना पायरेट्स