Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणे, नाशिक, जळगाव आणि साताऱ्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग

पुणे, नाशिक, जळगाव आणि साताऱ्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग
, शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020 (17:31 IST)
राज्यभरात पावसाचा जोर काहिसा कमी झालेला आहे. मात्र, मुंबईसह उपनगरात पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईतील उपनगरात कुर्ला, चेंबूर, सायन, माटूंगा परिसरात जोरदार पाऊस झालेला आहे. दुसरीकडे दमदार पावसानंतर राज्यभरातील पाणीसाठ्यांमध्ये उत्तम वाढ झालेली आहे. पुणे, नाशिक, जळगाव आणि सातारामधील धरणांमधून पाण्याचा विसर्गही सुरु केलेला आहे.
 
खडकवासला धरणातून सकाळी 5 हजार 136 क्यूसेस इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणात 72.30 टक्के पाणीसाठा आहे. खडकवासला धरण क्षेत्रात सध्या पाऊसाचा जोर ओसरला आहे. काल (13 ऑगस्ट) रात्री मुठा नदीत 16 हजार 500 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सध्या भिडे पुलाला लागून पाण्याचा प्रवाह सुरु आहे. खबरदारी म्हणून भिडे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. शिवाय भिडे पूलाला लागून असणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक बॅरिकेटिंग लावून बंद करण्यात आलेली. मुठा नदी काठालगत असणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Independence D‍ay Status स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा पाठवा