Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाऊस पुन्हा एकदा जोरदार आगमन करणार, तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

पाऊस पुन्हा एकदा जोरदार आगमन करणार, तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
, बुधवार, 12 ऑगस्ट 2020 (16:13 IST)
राज्यात पाऊस पुन्हा एकदा जोरदार आगमन करणार आहे. पुढच्या २४ ते ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्राला पाऊस झोडपून काढणार असल्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.
 
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईसह राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली. आता हा पाऊस पुन्हा एकदा मुंबईसह कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सॅटेलाईट इमेजवरून पश्चिम किनारपट्टीवर ढगांची दाटी झालेली स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे पूर्ण किनारपट्टी भागात पुढच्या दोन दिवसात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
 
ठाणे, रायगड आणि पालघर या तीन जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. या तीनही जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून मुंबईतही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच नाशिक आणि पुणे जिल्ह्यांत घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वीजं बिलं वाढलेली नाहीत, लोकांचा तसा समज झालाय-नितीन राऊत