Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निबंध भारतरत्न डॉ. भीमराव बाबासाहेब आंबेडकर

निबंध भारतरत्न डॉ. भीमराव बाबासाहेब आंबेडकर
, शनिवार, 3 एप्रिल 2021 (22:11 IST)
डॉ.भीमराव आंबेडकर, भारताला संविधान देणारे थोर नेते. यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातील एका लहानशा गावात झाला.यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ आणि आईचे नाव भीमाबाई होते. हे आपल्या पालकांचे 14 वे अपत्य होते. ते जन्मजात बुद्धिमान होते. 
अस्पृश्य आणि अत्यंत निम्न वर्ग मानल्या जाणाऱ्या महार जातीमध्ये यांचा जन्म झाला.यांच्या परिवाराशी सामाजिक आणि आर्थिक दृष्टया भेदभाव केले जात होते. यांचे बालपणीचे नाव रामजी सकपाळ होते.यांचे पूर्वज बऱ्याच काळ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात काम करायचे. त्यांचे वडील ब्रिटिश भारतीय सैन्याच्या महू छावणीत होते. त्यांचे वडील नेहमी त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर जोर देत असायचे. 
1894 साली त्यांचे वडील सेवानिवृत्त झाले .बाबासाहेंबाच्या आईच्या मृत्यू नंतर त्यांच्या काकूने त्यांचा आणि त्यांच्या भाऊ बहिणींचा सांभाळ केला. आपल्या सर्व भाऊ बहिणींमध्ये आंबेडकरच शिकले. त्यांना त्यांच्या एका ब्राह्मण शिक्षकांनी दत्तक घेऊन आपले नाव आंबेडकर दिले. 
बाबासाहेबांनी आपले विचार एका शोषित वर्गाच्या परिषदेत राजकीय दृष्टी जगासमोर मांडले. आपले विवादास्पद विचार असून  देखील त्यांची प्रतिमा न्यायशास्त्रज्ञाची होती. स्त्रियांना देखील पुरुषाप्रमाणे हक्क मिळावे यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या.त्यांनी स्त्रियांची गुलामगिरी दूर केली.त्यांनी नागपुरातील एका परिषदेत महिलांना स्वच्छता पाळा,मुलामुलींना शिक्षित करून महत्त्वाकांक्षी बनवा,त्यांचे न्यूनगंड दूर करा.असं सांगितले.दलितांना त्यांचा हक्क मिळावा या साठी ते लढत राहिले. ते सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार,अनीती,अत्याचार,अन्यायाला त्यांचा विरोध होता.जातीभेदाचे ते प्रखर विरोधी होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे असे ते म्हणायचे. त्यांच्या आचारात-विचारात राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा भरलेली होती.दलितांना देखील मानाचे जीवन जगता यावे. या साठी ते सातत्याने संघर्ष करत होते.त्यांनी केवळ दलितांसाठीच नव्हे तर शेतकरी आणि मजुरांसाठी देखील लढा दिला. अशा या महामानवाने समाजासाठी,देशासाठी महान कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विश्वाला मिळालेली महान देणगीच आहे. भारताच्या संविधानाचे निर्मिते या महामानवाने 6 डिसेंबर 1956 रोजी अखेरचा श्वास घेतला.   
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यशस्वी होण्यासाठी काही टिप्स अवलंबवा