Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

26 मार्चच्या शेतकरी संघटनांच्या भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा

26 मार्चच्या शेतकरी संघटनांच्या भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा
, बुधवार, 24 मार्च 2021 (07:50 IST)
केंद्रातील मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या आणि महागाईच्या विरोधात देशातील विविध शेतकरी संघटनांनी शुक्रवार 26 मार्च रोजी 'भारत बंद’ घोषणा केली आहे. या देशव्यापी संपाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा सक्रिय पाठींबा असून यादिवशी राज्यभर उपोषण आंदोलन केले जाणार आहे अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
 
नाना पटोले यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, 26 मार्च रोजी काँग्रेसतर्फे राज्यातील जिल्हा आणि तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी उपोषण केले जाणार आहे. यामध्ये काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे हे नागपूरात ,कुणाल पाटील अमरावतीत, शिवाजीराव मोघे औरंगाबाद येथे, बसवराज पाटील हे पुण्यात आणि नाशिकमध्ये आमदार प्रणिती शिंदे तसेच ठाण्यात नसीम खान हे पदाधिकारी वकार्यकर्त्यांसह उपोषणास बसणार आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परभणीत 31 मार्चपर्यंत संपूर्ण संचारबंदी