परभणी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. मागील 7 दिवसांत परभणी जिल्ह्यात तब्बल 2470 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे ही कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी बुधवार 24 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून 31 मार्च रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संपुर्ण संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.
दीपक मुगळीकर यांनी आपल्या आदेशात असेही म्हटले आहे की,जिल्ह्यात कोरोना संसर्गात वाढ होत असल्याने 45 वर्षे वयावरील नागरिकांनी कोरोना लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. तसेच मास्क वापरणे आणि सोशल डिस्टनसिंग नियम पाळणे गरजेचे आहे. तसेच गर्दी टाळण्याबरोबरच नागरिकांनी आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी.या सर्व गोष्टींचे पालन करणे हे नागरिकांच्याच हिताचे आहे.