Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Apple Rabdi अ‍ॅपल रबडी

Apple Rabdi अ‍ॅपल रबडी
, सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (12:42 IST)
साहित्य :-
गोड जातीची एक मोठ्ठ सफरचंद, लिंबाचा रस, आवडीप्रमाणे चिमूटभर दालचिनी पावडर, 1 टिस्पून बारीक केलेले अगर, 1 कप मिल्क पावडर, 1 टिस्पून साखर, 1 टिस्पून साजूक तूप.
 
कृती :-
एका पातेल्यात पाव कप पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस किंवा सायट्रीक अ‍ॅसिड आणि दालचिनी पूड एकत्र करा. सफरचंदाचा मधलाच गोलाकार भाग कापून वेगळा करा. मग ते वरील पाण्यातच किसा. आता हे मिश्रण शिजत ठेवा. सतत ढवळत रहा. करकरीत सफरचंदे असतील तर मिश्रण शिजायला वेळ लागेल. पिठूळ असतील तर लगेच शिजतील. शिजवून जॅम करायचा नाही. सगळे मिश्रण छान एकजीव झाले आणि पाणी आटले कि आच बंद करा. सफरचंदाच्या गोडीवर अवलंबून साखर वापरायची आहे कि नाही ते ठरवा.
 
साखर या मिश्रणातच घालून शिजवा. एका जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईत १ टिस्पून साखर टाका आणि मंद आचेवर ठेवा. थोड्याच वेळात साखर वितळेल आणि ती सोनेरी रंगावर जाईल. आणखी थोड्याच वेळात काही भागात तपकिरी होऊ लागेल. तसे होऊ लाहले कि त्यात अर्धा कप पाणी टाका.
 
त्यात साजूक तूप टाका. पाण्याला छान उकळी आली कि त्यात मिल्क पावडर टाका आणि डावेने भराभर ढवळा. पाणी गरम असल्याने मिल्क पावडर चटकन मिसळने आणि मिश्रणाला आटीव दूधाचा रंग आणि स्वादही येतो. आच बंद करून त्यात सफरचंदाचे मिश्रण टाका आणि गरज वाटली तर हँड मिक्सरने ब्लेंड करा. आणि चमच्या चमच्याने आस्वाद घ्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुम्हाला शिक्षक व्हायचे असेल तर येथे अर्ज करा, थेट मुलाखतीद्वारे नोकरी मिळेल