Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

महाशिवरात्र उपवासाला बनवा स्वादिष्ट राजगिरा पराठा रेसिपी

Rajgira Paratha
, मंगळवार, 25 फेब्रुवारी 2025 (08:00 IST)
साहित्य-
पनीर किसलेले - शंभर ग्रॅम
उकडलेले बटाटे मॅश केलेले - दोन 
कोथिंबीर चिरलेली - अर्धा कप 
मिरच्या बारीक चिरलेल्या - दोन 
किसलेले आले
सेंधव मीठ
जिरे पावडर -एक टेबलस्पून
तिखट - एक टेबलस्पून
शेंगदाणे कूट - १/४ कप
राजगिरा - दीड कप 
तूप - दोन चमचे 
ALSO READ: उपवासाची मखाना अक्रोड टिक्की रेसिपी
कृती-
एका मोठा बाउल घेऊन त्यात  वरील सर्व साहित्य घाला आणि मिक्स करा. सर्व साहित्य वापरून मऊ पीठ मळून घ्या तसेच पराठ्यासाठी पीठ मळताना त्यात एक ते दोन चमचे दही घाला, यामुळे मऊ पीठ तयार होईल. पीठ तयार झाल्यावर, पीठाचे छोटे गोळे घ्या आणि तुमच्या तळहाताच्या मदतीने ते गोल करा. आता पीठ दाबा आणि पोळपाटावर पराठा बनवा. पराठा तव्यावर ठेवा आणि दोन्ही बाजूंना तूप लावून शेका.आता एका प्लेटमध्ये काढा, तर चला तयार आहे आपला राजगिरा पराठा रेसिपी,    दही आणि चटणीसोबत नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हाय युरिक अ‍ॅसिडच्या समस्येने त्रास होत असेल तर तुमच्या आहारात या 6 गोष्टींचा समावेश करा