Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Father's Day 2021 :वडील बनल्यावर या वाईट सवयी सोडून द्या

Father's Day 2021 :वडील बनल्यावर या वाईट सवयी सोडून द्या
, सोमवार, 14 जून 2021 (22:54 IST)
वडील बनल्यावर पुरुष पूर्वीपेक्षा अधिक जबाबदार होतात. ते आपल्या कुटुंबीयांची काळजी तर घेतातच पण स्वतःच्या तब्बेतीची देखील काळजी घेतात. वडील बनल्यावर कोणताही पुरुष त्याच्या आरोग्याच्या वाईट तक्रारी 
त्यांच्या वाईट सवयी त्याच्या मुलांमध्ये येवो अशी इच्छा बाळगत नाही.जर आपण देखील आपल्या मुलांमध्ये चांगल्या सवयी लावू इच्छिता तर याची सुरुवात स्वतःपासून करावी.प्रत्येक पुरुषाने वडील बनल्यावर त्यांच्या वाईट सवयी सोडून दिल्या पाहिजे.
 
1 धूम्रपान आणि मद्यपान सोडा-आपण वडील म्हणून आपल्या मुलांवर अधिक प्रभाव पाडता आणि आपल्या सवयी देखील मुलांवर प्रभाव पाडतात.मुलं फक्त आईच्या सवयीचे अनुसरण करत नाही तर वडिलांच्या सवयीचे अनुसरण देखील करतात.तसेच धूम्रपान आणि मद्यपान केल्याने आरोग्यावर देखील दुष्प्रभाव पडतो. ज्याचा परिणाम भविष्यात जाऊन आपल्या कुटुंबाला भोगावा लागतो.
 
2 आळस सोडा आणि नियमित व्यायामाचा अवलंब करा- आळस सोडून आपण नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. या मुळे आपण केवळ तंदुरुस्त होणार नाही, परंतु आपली मुले लहान पणापासूनच व्यायाम करायला शिकतील, जेणेकरून पुढे जाऊन ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या देखील तंदुरुस्त राहतील आणि आरोग्याच्या समस्यांपासून दूर राहतील.
 
3 अयोग्य आहार घेणे बंद करा-वडील बनण्यापूर्वी आपण कोणत्या प्रकारचे आहार घेत होता , लग्नानंतर आपला आहार काय  होता आणि वडील बनताना आपल्या आहाराचा आपल्या मुलाच्या जन्माच्यावेळेस मुलाच्या आरोग्यावरही परिणाम होतो. जेव्हा आपली पत्नी गर्भधारण करते   तेव्हा आपल्या आणि आपल्या पत्नीच्या आरोग्याचा आणि आहाराचा आपल्या जन्म घेणाऱ्या मुलाच्या आरोग्यावर परिणाम होतो.
 
4 कमी झोपणे आणि चिडचिडेपणा करणं सोडा- आपल्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे.तरच आपण ऑफिसात आणि आपल्या घरात व्यवस्थित लक्ष देऊ शकाल. कमी झोप घेतल्याने चिडचिड होते. आणि आपल्या अशा व्यवहाराचा प्रभाव आपल्या मुलांवर पडतो.
 
5 राग करणे आणि पत्नीशी भांडणे टाळा- आपण रागीट आहात आणि लहान लहान गोष्टींवरून भांडण करता. तर असं करणं सोडा. आपल्याला असं करताना बघून आपले मुलं देखील असं वागतील. त्यांना लहान-लहान गोष्टींवर राग करणं  भांडण करणं सहज वाटेल आणि ते देखल घराच्या बाहेर जाऊन असं वागतील. 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठा आरक्षण: अजित पवार - शाहू महाराज छत्रपती यांच्या भेटीचा अर्थ काय?