Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फादर्स डे साजरा करण्यामागे दडलेली कथा

फादर्स डे साजरा करण्यामागे दडलेली कथा
, शुक्रवार, 17 जून 2022 (13:15 IST)
आम्ही दरवर्षी जूनच्या तिसऱ्या आठवड्यात फादर्स डे साजरा करतो आणि वडिलांबद्दल प्रेम व्यक्त करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, ही संकल्पना कुठून आली आणि कशी सुरू झाली? जाणून घ्या फादर्स डेच्या मागे दडलेली ही कहाणी -
 
असे मानले जाते की फादर्स डे पहिल्यांदा वॉशिंग्टनमध्ये 19 जून 1910 रोजी साजरा करण्यात आला होता. यामागेही एक रंजक कथा आहे – सोनेरा डोड ची कथा.
 
सोनेरा डोड लहान असताना तिची आई मरण पावली. फादर विल्यम स्मार्ट यांनी सोनेरोच्या आयुष्यात आईची कमतरता भासू दिली नाही आणि तिला आईचे प्रेमही दिले. 
 
1909 मध्ये, जेव्हा स्पोकाने चर्चमध्ये मदर्स डे यावर उपदेश सुरु होता, तेव्हा सोनेरा डोडच्या मनात विचार आला की जेव्हा मदर्स डे साजरा केला जातो तेव्हा फादर्स डे का नाही? नंतर सोनेराने ही कल्पना ओल्ड सेंटेनरी प्रेस्बिटेरियन चर्चचे पाद्री डॉक्टर कोनराड ब्लुह्म यांच्या मदतीने स्पोकेन वायएमसीए कडे नेली, जिथे स्पोकन वायएमसीए आणि मंत्रालयीन आघाडीने सोनेरा डोडच्या प्रस्तावाला जोरदार पाठिंबा दिला. आणि यानंतर 1910 मध्ये पहिल्यांदा फादर्स डे हा दिवस साजरा करण्यात आला. अशा प्रकारे 19 जून 1910 रोजी पहिल्यांदा फादर्स डे साजरा करण्यात आला.
 
1924 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कॅल्विन कॉली यांनी फादर्स डेला संमती दिली. त्यानंतर 1966 मध्ये राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी अधिकृतपणे जून महिन्याचा तिसरा रविवार फादर्स डे साजरा करण्याची घोषणा केली.
 
1972 मध्ये अमेरिकेत फादर्स डे कायमची सुट्टी म्हणून घोषित करण्यात आली. 
 
सध्या जगभर जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. भारतातही त्याची प्रसिद्धी हळूहळू वाढत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

SSC Result Maharashtra Board : दहावीच्या निकालात मुलींची बाजी, एकूण निकाल मात्र घसरला