घरात पैशे आणि उदंड आयुष्यसाठी या कोपर्‍यात लावाला फेंगशुईचा पौधा

घर व कार्यालयाची सजावट करण्यासाठी बाजारात विविध प्रकारची शोभेची फुलझाडे उपलब्ध आहेत. त्यात 'लकी' बांबूला महत्त्वाचे स्थान आहे. घराच्या सौंदर्यात भर घालणारा 'लकी बांबू' उन्नती, सौभाग्याचेही प्रतीक मानला जातो. 
 
पारदर्शी काचेच्या भांड्यात ठेवण्यात येणारे बांबूचे रोपटे विविध प्रकारच्या आकारात आपल्याला दिसतात. या रोपट्याचा विशेष म्हणजे मातीचा उपयोग न करता केवळ पाण्यावर त्याला जगवता येते. शक्यतो लकी बांबूला काचेच्या भांड्यात पाणी घालून ठेवले जाते. 
 
लकी बांबूचे रोपटे हे केवळ पाण्यावर स्वस्थ ठेवता येते. पाण्यावरच मोठे होणार्‍या या डेकोरेटीव्ह रोपट्याला छानशी हिरवी पालवी फुटत असते. बांबूच्या बारीक बारीक काड्या एकत्र बांधून बंडल करून त्याला विविध प्रकारचे आकार दिले जातात. त्यामुळे लकी बांबूची किंमत त्याच्या आकारावरून ठरवली जात असते. 
 
-फेंगशुईनुसार घरातील पूर्वी आणि दक्षिण-पूर्वी कोपर्‍यात बांबूच्या रोपाला ठेवल्याने विशेष फायदा मिळतो. असे केल्याने धन, समृद्धी आणि उदंड आयुष्या सारखे बरेच फायदे मिळतात. म्हणून याला घरी ठेवणे फारच गरजेचे आहे.  
 
-फेंगशुईत रोपांच्या संख्येचे विशेष महत्त्व असतो. चिनी फेंगशुई शास्त्रानुसार विषम संख्या असणारे पौधे लावल्याने घरात सुख आणि शांती मिळते. 3 बांबू आनंदासाठी, 5 बांबू धन आणि समृद्धीसाठी आणि 9 बांबू सौभाग्यासाठी शुभ मानले जातात. तरी देखील याला लाल रिबन आणि काचेच्या बरणीत घालून ठेवायला पाहिजे.    
-बांबूच्या रोपाला ऑफिसच्या टेबलावर उजवीकडे ठेवणे शुभ मानले जाते. जर मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल किंवा अडचणी येत असतील तर  स्टडी टेबलावर बांबूचे रोप ठेवल्याने नक्कीच यश मिळेल.  
 
-वैवाहिक जीवनात आपल्या पार्टनरचे प्रेम मिळवण्यासाठी शयनकक्षात दोन बांबूचे रोपांचे जोडे ठेवणे शुभ असते.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख दैनिक राशीफल 02.07.2018