लिंबू: लिंबू डेड स्कीन स्वच्छ करण्यासाठी सर्वोत्तम आहे. पाण्यात लिंबाचा रस मिसळून 5 मिनिटासाठी मांड्यांवर लावून ठेवावे नंतर धुऊन घ्यावे.
मध: मध हातात घेऊन पाच मिनिट तेथील त्वचा घासावी. अर्धा तास तसेच राहू द्यावे नंतर पाण्याने धुऊन टाकावे.
दही: डाग मिटवण्यासाठी दही उपयोगी ठरतं. यात ओटचे पीठ, बेसन आणि कणकेचा कोंडा मिसळून स्क्रब तयार करू शकता.
काकडी: दररोज तिथली जागा काकडीच्या स्लाइसने घासावी. हवं असल्यास काकडीवर लिंबू पिळून घ्यावा.
टोमॅटो: मांड्यांवर टोमॅटो पल्प लावावा. 20 मिनिटाने धुऊन घ्या.
नारळ तेल: एक चमचा नारळाच्या तेलात एक चमचा लिंबाचा रस मिसळून मांड्यांच्या जवळपास लावा. 10-15 मिनिटानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका.
ओटचे पीठ: मांड्याच्या जवळपासच्या त्वचेचं काळपटपणा दूर करण्यासाठी याने स्क्रब करून डेड स्कीन हटवू शकतात. दोन चमचे ओटमीलमध्ये लिंबू किंवा टोमॅटो रस मिसळा. 20 मिनिट तसेच राहून द्या नंतर हलक्या हाताने मसाज करा व नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका.
पपई: पपईचा पेस्ट मांड्यांना लावल्याने त्वचा चमकदार होते. पपई अशुद्धी दूर करण्यात मदत करतं.
ऑलिव्ह तेल: लिंबू रस, गुलाब जल, ऑलिव्ह तेल आणि अंड्यातील पिवळ बलक मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट मांड्यांच्या डेड स्कीनवर लावा. नंतर धुऊन टाका.