स्ट्रेट हेअरचे फॅशन ट्रेडमध्ये असून यासाठी लोकं महागडे ट्रीटमेंट करवतात. यासाठी वापरल्या जाणार्या केमिकल्समुळे केसांना नुकसानही होतं. जर आपल्या माहीत नसेल तर आज जाणून घ्या केस स्ट्रेट करण्यासाठी घरगुती उपाय:
दूध
दुधात प्रोटीन असल्यामुळे केस नरम होतात. हे स्वाभाविक रूपाने कुरळे असलेल्या केसांना सरळ करण्यात मदत करतं.
पहिली कृती: एक कप दूध आणि मिसळा. आपण हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरून ठेवू शकता. हे लावण्यापूर्वी केस विंचरू घ्या. आता हे मिश्रण स्प्रे करून पुन्हा केसांवरून कंगवा फिरवा. 20 मिनिट असेच राहू द्या. नंतर केस शैम्पू आणि कंडीशनरने धुऊन घ्या.
दुसरी कृती: एक कप दुधात 3 चमचे मध टाकून पेस्ट तयार करा. हे दाट करण्यासाठी यात 2-3 चमचे मॅश केलेले केळ घाला. हे मिश्रण केसांवर लावून वाळू द्या. किमान एक तास तरी केसांमध्ये हे मिश्रण राहू द्या. वाळल्यावर केस धुऊन घ्या.
ऑलिव्ह ऑयल आणि अंडं
सर्वात आधी 2 अंडी फेटून घ्या आणि यात 4 चमचे ऑलिव्ह तेल घाला. केसांना लावून कंगवा फिरवा. नंतर शॉवर कॅप घाला आणि 45 मिनिट असेच राहू द्या. नंतर शैम्पूने केस धुऊन टाका.
मुलतानी माती
एक कप मुलतानी मातीमध्ये एक अंड्याचा पांढरा भाग आणि दोन चमचे तांदळाचे पीठ मिसळून घ्या. मिश्रण तयार करायला पाण्याची गरज भासल्यास जरा पाणी टाकावे. हे मिश्रण केसांना लावून कंगवा करून घ्या. एका तासाने पाण्याने केस धुऊन टाका. आता केसांवर दुधाने स्प्रे करा आणि 15 मिनिटाने केस शैम्पूने धुऊन टाका.
गरम तेलाने मालीश
आपल्या केसांची कोमट तेलाने मालीश करा. यासाठी आपण आपल्या आवडीचे तेल वापरू शकता. पूर्ण केसांना तेल लागावं म्हणून तेल लावल्यावर केस विंचरू घ्या. याने केस धुताना तुटत नाही. नंतर केसांना गरम टॉवेलने वाफ द्या. अर्ध्या तासाने हलक्या शैम्पूने केस धुऊन टाका.
एरंडेल तेल
गरम एरंडेल तेल ने मालीश करा. नंतर गरम टॉवेलने केसांना वाफ द्या आणि 30 मिनिट तसेच राहू द्या. नंतर हलक्या शैम्पूने केस धुऊन टाका. हे आपण आठवड्यातून दोनदा करता येईल.
व्हिनेगर
केसांना शैम्पू केल्यावर कंडिशनर करा. कंडीशनरनंतर गार पाण्याच्या मग्यात व्हिनेगरचे काही थेंब टाकावे आणि याने केस धुवावे.
केळी आणि मध
दोन केळी मॅश करून त्यात 2 चमचे मध, 2 चमचे ऑलिव्ह तेल आणि 2 चमचे दही मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट आपल्या पूर्ण केसांवर लावून शॉवर कॅपने केस कव्हर करा. अर्ध्या तासाने केस धुऊन टाका.