Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अर्जेंटिनाचा सर्वात मोठा पराभव

अर्जेंटिनाचा सर्वात मोठा पराभव
निझनी , शनिवार, 23 जून 2018 (12:52 IST)
रशियात खेळल जात असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत फ गट साखळी सामन्यात क्रोएशिाने बलाढ्य अशा अर्जेंटिनाचा 3-0 ने पराभव केला.
 
क्रोएशियाने पहिल्या सामन्यात नाजेरिायाला नमवले होते. त्यामुळे क्रोएशियाने दुसरा विजय मिळवून उपान्त्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले.
 
आइसलँड - अर्जेंटिना संघात 1-1 अशी बरोबरी झाली होती. त्यामुळे बाद फेरी पक्की करण्यासाठी अर्जेंटिनाला क्रोएशियाविरुध्द विजय आवश्यक  होता; परंतु क्रोएशियाच्या खेळाडूंनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला.
 
या पराभवामुळे अर्जेंटिनाचा बाद फेरी प्रवेश धोक्यात आला आहे. अर्जेंटिनाचा विश्वचषक स्पर्धेत 60 वर्षांमधील हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. 2002 साली विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनाचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले होते.
 
लिओनेल मेस्सी दोन साखळी सामन्यात गोल करू शकला नाही. अर्जेंटिनाच्या चाहत्यांसाठी पराभव जिव्हारी लागणारा ठरला आहे. मेस्सीने विश्वचषक स्पर्धेत गोल करून 647 मिनिटे झाले आहेत. 2014 च्या साखळी सामन्यात मेस्सीने नाजेरियाविरुध्द गोल केला होता. त्यानंतर सहा सामन्यात मेस्सी गोल करू शकला नाही. 
 
आकडेवारीनुसार मेस्सीने बार्सिलोना क्लबसाठी 93.3 मिनिटांनी एक गोल केला आहे. विश्वचषकात मात्र त्याचा गोल करण्याच वेग मंदावला आहे व तो 270 मिनिटाला एक असा झाला आहे. रशियातील विश्वचषक स्पर्धेत त्याने 13 वेळा गोल करण्याच प्रयत्न केला परंतु त्याला यश मिळाले नाही.
 
11 विश्वचषक स्पर्धेनंतर अर्जेंटिनाला साखळी फेरीतील पहिल्या दोन सामन्यापैकी किमान एक सामना जिंकण्यात अपयश आले आहे. 1958च्या विश्वचषक स्पर्धेत जेकोस्लोव्हाकियाने साखळी फेरीत अर्जेंटिनाचा 6-1 ने पराभव केला होता. 2014 च्या विश्वचषक स्पर्धेचा अर्जेंटिना संघ उपविजेता आहे. मेस्सीला अर्जेंटिनास विश्वचषक मिळवून देण्याची ही शेवटची संधी आहे, असे पाबलो झाबेलटा याने सांगितले. 2014 च्या अर्जेंटिना संघात झाबलेटा हाही होता.
 
या पराभवानंतर अर्जेंटिना संघावर टीका होत आहे. अर्जेंटिनाने 1958 साली मारियो केम्पसच तर 1978 साली डिएगो मॅराडोनाच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता.
 
क्रोएशियाकडून रेबिक (53), मोडरिक (80) आणि रॅकिटिक (91) यांनी गोल केले. क्रोएशियाच्या खेळाडूंनी सुरुवातीपासून खेळावर नियंत्रण ठेवले होते. अर्जेंटिनाच्या खेळाडूंना त्याना रोखण्याच प्रयत्न केला; परंतु त्यांना यश लाभले नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संदिपान थोरात, आमदार बबनराव शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल