rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'द्रोण' : स्वतःचा शोध

द्रोण  स्वतःचा शोध
IFMIFM
निर्माता : सृष्टी बहल, सुनील लुल्ला
दिग्दर्शक : गोल्डी बहल
संगीत : ध्रुव घाणेकर
कलाकार : अभिषेक बच्चन, प्रियंका चोप्रा, केके मेनन, जया बच्चन

आपल्या भूतकाळाबद्दल अनभिज्ञ असलेल्या आदित्यच्या (अभिषेक बच्चन) जीवनावर 'द्रोण’ ची कथा बेतली आहे. एका कुटुंबाने त्याचा सांभाळ केला आहे. आपण कोण आहोत आणि या कुटंबाशी आपला काय संबंध आहे, याची त्याला काहीच माहिती नसते.

webdunia
IFMIFM
लहानपणापासूनच त्यांच्या स्वप्नात एक निळ्या - गुलाबी रंगाचे फुलपाखरू येत असे. ते त्याला काही सांगून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत असे. जादूगार रिज रायजदा (केके मेनन) याचे संपूर्ण पृथ्वीवर राज्य करण्याचे स्वप्न असते. पण, यासाठी त्याला एका रहस्याचा उलगडा करणे आवश्यक असते. हे काम तो द्रोणला पराभूत करूनच करू शकतो. पण, द्रोण कोण आहे याची त्याला माहिती नसते. असेच एकवेळी आदित्य व रिज आमनेसामने येतात. आपल्या जादुई शक्तीने तो आदित्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. पण, आदित्य पळून जोतो.

webdunia
IFMIFM
एका समाजाची प्रमुख असलेल्या सोनियाशी (प्रियंका चोपड़ा) आदित्यची भेट होते. आदित्यला त्याच्या भूतकाळाची माहिती देताना ती त्याला जन्मस्थळ प्रतापगडावर घेऊन जाते त्याठिकाणी त्याची (जया बच्चन) आई शी भेट होते. आता रिज आणि आपल्या युद्धावरच मानवाचे भवितव्य अवलंबून आहे, याचा उलगडा त्याला होतो. यानंतर काय होते त्यासाठी पाहा 'द्रोण'

‘द्रोण’ ने केली अभिषेकची स्वप्नपुर्ती...

Share this Story:

Follow Webdunia marathi