Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चित्रपट परीक्षण: सुल्तान

चित्रपट परीक्षण: सुल्तान
हल्ली बॉलीवूडमध्ये खेळ पृष्ठभूमीवर सिनेमे तयार होत आहे आणि हिट देखील. सलमान खानचा सुल्तान सिनेमाही कुस्ती खेळावर आधारित असून एक प्रेम कहाणी आहे असे म्हणायला हरकत नाही.
 
30 वर्षाच्या वयातही पतंग लुटणारा हरियाणाचा सुल्तान (सलमान खान) आपल्या जीवनाप्रती गंभीर नाही. स्त्री कुस्तीपटू आरफा हुसेन (अनुष्का शर्मा) हिच्याशी लग्न करण्यासाठी तो सीरियस होतो आणि कुस्तीत खूप नाव कमावतो. दोघं एकत्र येतात पण काही कारणामुळे दोघांमध्ये दुरी निर्माण होते आणि सुल्तान ढासळतो. परिस्थितीमुळे त्याला 'प्रो टेक डाउन' स्पर्धेत भाग घ्यावा लागतो पण 40 वर्षाच्या वयात पोट निघालेल्या सुल्तानसमोर खूप आव्हान असतात. तो यातून कसा बाहेर पडतो? त्याला त्याचं प्रेम पुन्हा मिळतं का? याचे उत्तर सिनेमात आहे.
कहाणी, स्क्रीनप्ले, संवाद आणि दिग्दर्शन अली अब्बास जफरने केले असून त्याने कहाणी दोन भागात वाटली आहे. एकीकडे कुस्ती तर दुसरीकडे प्रेम. दोन्ही गोष्टी छानरित्या जुळवून आण्याला आहे.
 
पहलवानच्या रूपात सलमान जरा अनफिट वाटला तरी त्याचे स्टारडम यावर हावी होतं. दिग्दर्शकाने सलमानच्या सुपरस्टार असण्याचा फायदा उचला असून अनेक अविश्वसनीय घटना घडवून आणल्या आहे कारण की तो तर सुपरस्टार आहे, काहीही करू शकतो. अनेकदा सलमानऐवजी एखादा तरुण असायला हवा असं वाटत असलं तरी गर्दी जमवण्यात तो कमी पडला असता हे मात्र खरंय.
 
दोन तास 50 मिनिटाच्या या सिनेमात सलमानचे फॅन्स त्याचा भरपूर दर्शन घेऊ शकतील. फस्ट हाफ फास्ट असून सेंकड हाफमध्ये सिनेमा गडबडतो पण शेवट गोड तर सर्व गोड. आपल्या शानदार शैलीत सलमानने क्लाइमेक्समध्ये जान टाकली आहे.
 
अनुष्का शर्मा ने आपली भूमिका दमदार साकारली असून तिचा अभिनय शानदार आहे. लहानश्या भूमिकेत रणदीप हुड्डा आणि अमित सध, परीक्षित साहनी सह इतर कलाकारांनी अभिनयाची छाप सोडली.
 
'सुल्तान' पर्फेक्ट सिनेमा नसला तरी मनोरंजक आहे. आणि सलमानचे फॅन्स असाल तर काहीही सांगण्याची गरजच नाही.
 
बॅनर : यश राज फिल्म्स
निर्माता : आदित्य चोप्रा
दिग्दर्शक : अली अब्बास जफर 
संगीत : विशाल-शेखर
कलाकार : सलमान खान, अनुष्का शर्मा, रणदीप हुड्डा, अमित सध 
सेंसर सर्टिफिकेट : यूए * 2 घंटे 50 मिनिट 
रेटिंग : 3/5 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कॉलर ट्यून