Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चित्रपट परीक्षण : रईस

चित्रपट परीक्षण : रईस
, बुधवार, 25 जानेवारी 2017 (14:12 IST)
डायरेक्टर: राहुल ढोलकिया 
स्टार कास्ट: शाहरुख खान, माहिरा खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, अतुल कुलकर्णी, आर्यन बब्बर
वेळ : 2 तास 22 मिनिट   
सर्टिफिकेट: U/A
नॅशनल अवॉर्ड विनिंग चित्रपट 'परजानिया'चे डायरेक्टर राहुल ढोलकिया ने यंदा 80च्या शतकातील आधारित चित्रपट 'रईस' बनवले आहे ज्यात प्रथमच ते शाहरुख खानसोबत काम करत आहे. या अगोदर राहुल ने 'लम्हा' आणि 'मुंबई कटिंग' सारखे चित्रपट देखील बनवले आहे.  
 
कथा   
ही कथा 80च्या दशकातील गुजरातची आहे जेथे शाळेत जाणारा रईस (शाहरुख खान) आणि कबाडीचे काम करणारी त्याची आई  (शीबा चड्ढा) गरीबीत आपले जीवन काढत होते. घराची अशी अवस्था बघून आधीतर रईस देशी दारूचे काम सुरू करतो पण रेड पडल्यामुळे त्या कामात त्याला अडचण येऊ लागते. नंतर रईस इंग्रेजी दारूच्या दुकानावर (अतुल कुलकर्णी)चा शागिर्द बनून जातो. डोक्याने तेज असल्याने रईस एकवेळेनंतर स्वत:चा धंधा सुरू करण्याची इच्छा ठेवतो पण त्यासाठी त्याच्या गुरु शर्त ठेवतो आणि त्यासाठी रईसला 3 दिवसांच्या वेळ दिला जातो.   
 
webdunia
रईस या शर्यतीला पूर्ण करण्यासाठी मूसा भाईजवळ जातो. मूसा भाई, रईसच्या स्टाइलमुळे इम्प्रेस होतो आणि त्याची मदत करतो. नंतर कथेत बरेच मोड येतात, परत आल्यानंतर रईस स्वत:चा दारूचा धंधा सुरू करून देतो, नंतर एस पी जयदीप अम्बालाल मजूमदार (नवाज़ुद्दीन सिद्दीकी) मुळे दारूच्या व्यापार्‍यांवर कारवाई करण्यात येते पण रईस नेमही स्वत:चा बचाव करत तिथून निघून जातो.  
 
का बघावा चित्रपट  
शाहरुख खानची डेयरिंगने भरलेली अदा आणि त्याच्यासोबत नवाजुद्दीन सिद्दीकीची उपस्थिती चित्रपटाला फारच दिलचस्प बनवते. तसेच चित्रपटाचे बाकीचे कलाकार जसे मोहम्मद जीशान अयूब, अतुल कुलकर्णी इत्यादींनी देखील उत्तम काम केले आहे. माहिरा खानला येथे चांगला मोका मिळाला होता पण ती त्याला चांगल्या प्रकारे निभावू शकली नाही.  
 
चित्रपटाचे डायलॉग्स आधीपासूनच हिट आहे आणि जेव्हा ते चित्रपटात येतात तर प्रेक्षक शिट्या आणि ताळ्या वाजवतात. खास करून शाहरुखचे फँससाठी पूर्ण पैसे वसूल आहे.   
 
चित्रपटाचे लोकेशंस, सिनेमॅटोग्राफी आणि बॅकग्राऊंड तुम्हाला 80च्या दशकात बसलेले आहे असा समज करवून देतो.  
 
अॅक्शन सीक्वेंस देखील कमालीचे आहे तसेच लैला मैं लैला गाणे देखील कथेत एक नवीन घुमावं आणतो.  
शाहरुख खानचे डायलॉग्ससोबत नवाजुद्दीनची 'कोई भी काम लिखित में लेने'ची स्टाइल बरीच फेमस होईल. शाहरुखने आपल्या भूमिकेला जोरदार बनवण्यासाठी फार मेहनत घेतली आहे जी स्क्रीनवर दिसून येत आहे तसेच नवाजुद्दीन सीरियस रोलमध्ये फारच फबतो.  
 
webdunia
कमजोर कडी
चित्रपटाचा बजेट फार तगडा होता पण बघताना काही कमी आहे अस वाटत आहे. असे काहीही नवीन या चित्रपटात दिसून आले नाही. माहिरा खान पूर्णपणे एक्सप्रेशनलेस होती आणि रोमांसचा एंगल झिरो होता. यामुळे बरेच साँग्स आणि सिक्वेंस निराश करतात. चित्रपटाचा पहिला भाग चांगला आहे, पण सेकंड हाफ ओढल्यासारखा वाटतो. ज्याला अधिक उत्तम केले असते तर चित्रपट अधिक प्रभावशाली झाला असता.  
 
बॉक्स ऑफिस
वृत्तानुसार चित्रपटाचे बजेट किमान 90 कोटी सांगण्यात येत आहे आणि भारतात किमान 2500 स्क्रीन्समध्ये रिलीज करण्यात येणार आहे. ट्रेड पंडितांचे मानले तर रईसची ओपनिंगतर चांगली होईल बाकी सोमवारपासून चित्रपटाच्या कलेक्शनवर मोठा असर पडेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राधिकाही ट्रम्पविरोधात