आतापर्यंत गुप्तचर या विषयावर आधारित चित्रपटांमध्ये नायक किंवा नायिकेला सुपर पॉवर असल्यासारखे दर्शवले गेले आहे परंतू मेघना गुलजार हिची नायिका गुप्तचर तर आहे पण अगदी सामान्य व्यक्ती देखील. चित्रपटात कुठल्याही प्रकारचा मसाला नाही, आहे तर केवळ देशाप्रती प्रेम आणि समर्पण. 'राझी' हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सेहमत’ या कादंबरीवर आधारित आहे.
एका सामान्य मुलीची जी 1971 मध्ये इंडो-पाक युद्ध दरम्यान आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून पाकिस्तानाच्या आर्मी कुटुंबातील एका तरुणाशी विवाह बंधनात अडकते. आपल्या इच्छेने, बुद्धिमत्तेने, आणि साहसामुळे बलिदान देत देशप्रेमाचे उदाहरण ठेवते.
स्क्रिप्ट सिनेमाचे हृदय आहे असे म्हणायला हरकत नाही कारण त्यावर एवढे प्रामाणिकपणे काम केले गेले आहे की दर्शक प्रत्येक गोष्ट शंभर टक्के खरी आहे असेच समजतात. कसलेलं दिग्दर्शन आपल्या कोणत्या ही सीनमध्ये विचार करण्याची वेळ देणार नाही. कहाणी आणि कलाकारांवर असलेली पकड आपल्याला सीमेवर असल्याची जाणीव करवतो.
आलिया भट्टचं दमदार अभिनय चित्रपटाच रंग भरून काढतं. नेहमी ग्लॅमर्स आणि मस्तीखोर आलियाला जेव्हा गंभीर भूमिका साकारण्याची वेळ येते तर ती प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडते.
विक्की कौशलसह रजित कपूर, जयदीप अहलावत, सोनी राजदान आणि अश्वत्थ भट्ट सारख्या कलाकारांनीदेखील आपल्या भूमिकांना न्याय दिले.
सामान्य मुलीचे शौर्य आणि असाधारण देशभक्तीची भावना जाणून घेण्यासाठी चित्रपट बघणे आवश्यक आहे. राझी त्या सर्व देशभक्तांसाठी भेट आहे ज्यांचे आपल्या देशावर अत्यंत प्रेम आहे.