नेट वरची थेट 'दोस्ती'

इंटरनेटच्या माध्यमातून जगं इतकं जोडलं गेलंय की, विचारता सोय नाही. अवघ्या काही सेकंदात माझ्या नेटवरून मी अमेरिका ते आफ्रिकेपर्यंत नवा मित्र जोडू शकतो. अशीच एक वेबसाइट सध्या भारतभर चर्चेचा विषय झाली आहे. वेबदुनिया डॉट कॉमची दोस्ती डॉट कॉम ही...

ऑरकुटरवर मैत्री करणं जितकं चांगलं आणि आकर्षक आहे, त्यापेक्षा अधिक पटीने या माध्यमातून मैत्री करणं चांगलं आहे.

कारण मुद्दा आहे भाषेचा. शिक्षणात इंग्रजी आली तरी ती तितकी सरावाची झालेली नाही. त्यामुळे इंग्रजीत लिहिणे अडचणीचे ठरते. शिवाय रोमन लिपीत मराठी लिहिले तरी त्याचा अर्थ समजून घेण्यात वेळ जातो. नेमकी हीच अडचण आता या नव्या वेबसाईटने दूर केली आहे.

वेबदुनिया डॉट कॉमच्या माध्यमातून विविध भाषांमधून पोर्टल तर आतापर्यंत चालवले जात आहेतच याशिवाय आता आपल्या भाषेत दोस्ती करण्यासाठी या वेबसाइटने खास दोस्ती ही ऑर्कुटच्या धरतीवर साईट सुरू केली आहे. या साईटची खासियत म्हणजे यावर तुम्ही आपल्या मातृभाषेत आपल्या मित्रांशी घट्ट मैत्री करू शकता.

आईची भाषा मुलं लवकर समजतात असे म्हणतात. याचाच आधार घेत ही साईट तब्बल नऊ विविध मातृभाषांमध्ये तयार करण्यात आली आहे.

ओके आणि थ्यँक्यूपेक्षा.. अच्छा बरं.... जातो, जाते, भेटू परत, असे मराठी संवाद यावर आपल्याला पाहायला मिळतील.

जॉनी बरोबरच जनक आणि सॅम बरोबर सुमन अशी मराठी नावंही यावर आहेत. या साईटची एक खासियत म्हणजे ही साईट आपल्या मातृभाषेत असल्याने आपल्याला यावर कोणतीही माहिती अगदी त्याच भाषेत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

- नितिन फलटणकर

एकमेकांचे फोटो, आपले प्रोफाइल, आपल्याला आवडतं गाणं (अगदी मराठीत का असेना) तेही आपण इथे टाकू शकता. या साईटच्या माध्यमातून आपण ताज्या घडामोडींचाही वेध घेऊ शकता. मित्र ऑनलाईन असेल तर ठीक अन्यथा साईटवरील स्क्रॅपबुक आहेच की मग...

आपल्या घरात एखादा कार्यक्रम झाला असेल आणि त्याचा एखादा व्हिडिओ आपल्यालनातेवाईकांना दाखवायचा असेल तर याची सोयही या साईटवर आहे.

बरं मैत्रिणीने एकदम फुलटू झक्कास फोटो पाठवला आहे, आणि तो केवळ आपण एकट्यानेच पाहावे असे जर तिला वाटत असेल तर... तर काय डोंट टेक टेन्शन आहो यावर तिही सोय आहे.

सेटिंगमध्ये आपले फोटो आणि व्हिडिओज कोणी पाहावे अथवा कोणी पाहू नये याची चाबी आता आपल्या हातात आहे. आपण ते लॉक करू शकतो.

आपल्या दोस्तीच्या प्रोफाइलवर कोणी कितीवेळा भेट दिली याची माहितीही आपल्याला यावर पाहायला मिळते, अगदी नावासह.

या साईटच्या माध्यमातून तुम्ही इतर काही महत्त्वाच्या साईटचा मेल आयडीही ओपन करून पाहू शकता. चॅटींग करुन कंटाळा आलाय.. मग काय? काळजी नाही. अगदी मराठी, हिंदी, आणि इंग्रजी भाषेतही आपण या साईटवर फुकटात गेम्स खेळू शकता. आपल्याला आवडतो त्या विषयाचे वाचनही करु शकता. स्वत:चा ब्लॉग्स तयार करु शकता. इतके सारे अगदी एका क्लिकवर आणि फुकटात

आता इतकी माहिती दिल्यानंतर कशाची वाट पाहताय. आजच भेट द्या दोस्ती डॉट कॉमला आणि आपला दोस्ती आयडी सुरू करा...
साईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख मोनोक्रोम ड्रेस कसे परिधान करावे?