Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Friendship Day Special : कोरोनाकाळात फ्रेंडशिप डे कसा साजरा करावा

Friendship Day Special : कोरोनाकाळात फ्रेंडशिप डे कसा साजरा करावा
, गुरूवार, 30 जुलै 2020 (12:49 IST)
कोरोना व्हायरस, लॉकडाउन, सामाजिक अंतर, विलगीकरण(क्वारंटाइन) मुळे सर्व लोक घरातच राहण्याला जास्त प्राथमिकता देत आहे. अश्या मुळे वाढदिवसाचा समारोह असो किंवा इतर कोणतेही समारंभ सर्व काही रद्द करावं लागत आहे. ज्या लोकांना प्रत्येक प्रसंगाला साजरं करणं आवडत, हे त्यांचा साठी फार अवघड असू शकत. पण हे कुठेतरी सकारात्मक देखील आहे, कारण असे केल्याने आपण स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो, तसेच अंतर राखल्याने आपण आपल्या नात्यांना कसं काय जपू शकतो, कसं काय एकत्र न राहता देखील साजरा करता येईल, या सर्व गोष्टी शिकण्याची संधी मिळत आहे.
 
फ्रेंडशिप डे जवळ येत असताना, या मैत्री दिनाला अतिशय खास पद्धतीने साजरा करायला आवडणाऱ्यांना यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नेहमी प्रमाणे साजरा करता येणार नाही. पण आपल्याला निराश होण्याची काहीही गरजच नाही कोरोनाच्या काळात आपण हे सर्व काही शिकू शकता ज्याची आपण कल्पनाही केली नसेल. पण हे लक्षात ठेवा की हा काळ देखील आपल्यासाठी संस्मरणीय राहील. तर मग 2020 च्या मैत्री दिनाला देखील अविस्मरणीय करू या. सर्व नियमांना पाळून आपण या खास प्रसंगाचा आनंद घेऊ शकाल. कसं काय? चला तर मग जाणून घेऊ या.
 
व्हर्च्युअल (आभासी )पार्टी करू शकता-
जर आपण आपल्या फ्रेंडशिप डे ला साजरा कण्यासाठी इच्छुक असाल आणि या खास दिनाला संस्मरणीय बनवू इच्छित असाल आणि ते ही आपल्या मित्रांसह, तर आपण व्हर्च्युअल पार्टी करू शकता. सध्याच्या परिस्थितीत व्हर्च्युअल पार्टीच एकमेव उपाय आहे. अश्या वेळी आपण आपल्या दोस्तांसह व्हिडिओ कॉल करण्याची एक वेळ ठरवून घ्या. प्रत्येक जण आपल्याशी परिचित आहे ह्याची खात्री बाळगून घ्या आणि कॉन्फरन्सिंग पार्टीचा आनंद घ्या. या वेळी आपण आपल्या मित्रांशी खूप गप्पा करा, केक कापा आणि फोटो काढा.
 
घरच्या घरीच फ्रेंडशिप बॅण्ड बनवा-
आपण हा विचार करून आपली मज्जा घालवू नका की कोरोना मुळे बाहेर कुठं ही जाऊ शकत नाही तर फ्रेंडशिप बॅण्ड कसं काय बाजारपेठेतून विकत घेता येईल? आपण सुरक्षा आणि नियमांचे अनुसरणं करून या खास दिनाला अजून चांगले बनवू शकता. आपण घरच्या घरीच फ्रेंडशिप बॅण्ड बनवू शकता. हे आपल्याला सृजनशील तर बनवेलच, तसेच या विशेष दिनासाठी आपण काहीतरी नवीन शिकाल.
 
आपल्या मित्रांशी चर्चा करावी की पार्टी कशी करावी ?
सर्व नियोजन आपण स्वतःच करू नये. आपल्या मित्रांशी बोला, त्यांचा कडून सल्ले घ्या आणि त्यानुसार हा दिवस कसा साजरा करता येईल याचा विचार करा. असे केल्याने आपण आणि आपले मित्र सर्व मिळून या दिवसाला अधिक चांगले बनवू शकता.
 
ड्रेस थीम सह साजरा करा-
फ्रेंडशिप डे च्या दिवशी आपण आपल्या मित्रांसह ड्रेस थीम देखील ठरवू शकता. असे केल्याने आपला हा दिवस अधिक मनोरंजक बनविण्यास मदत होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Rakshabandhan health Tips : सणासुदीच्या काळात वाढत्या वजनाला नियंत्रित करण्यासाठीच्या या 10 टिपा जाणून घेऊ या....