Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ganpati Visarjan 2024 या पद्धतीने करा गणेश विसर्जन

ganesh visarjan
, सोमवार, 9 सप्टेंबर 2024 (17:13 IST)
गणेश चतुर्दशी उत्सव सुरू झाला आहे. या शुभ दिवशी लोक आपल्या घरी गणपतीची मूर्ती आणतात. ते 10 दिवस बाप्पाची पूजा करतात आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करून गणपतीला निरोप देतात. मात्र काही लोक अनंत चतुर्दशीपूर्वीच बाप्पाला निरोप देतात. तर जाणून घ्या गणेश विसर्जनाची पूजा पद्धती.
 
गणेशस्थानाप्रमाणेच गणपती विसर्जन पूर्ण विधीपूर्वक करणे आवश्यक आहे. अन्यथा उपासनेचे पूर्ण फळ मिळत नाही. गणपती विसर्जनाच्या पूजेच्या पद्धतीची माहिती- 
 
गणपती विसर्जन पूजा पद्धत
सकाळी लवकर उठा. आंघोळ वगैरे झाल्यावर स्वच्छ कपडे घाला.
गणेशाची आराधना करा.
श्रीगणेशाला फळे, फुले आणि मिठाई अर्पण करा.
गणपतीची मूर्ती दोन्ही हातांनी उचलून विसर्जनस्थळी न्या.
विसर्जनाच्या ठिकाणी पाट ठेवा. त्यावर लाल रंगाचे कापड पसरवा. त्यावर मूर्ती ठेवा.
देवाला हळद आणि कुंकू लावून तिलक लावा.
बाप्पाला अक्षता अर्पण करा.
देवासमोर तुपाचा दिवा लावावा.
बाप्पाला फुलांची माळ घाला.
मोदक अर्पण केल्यानंतर बाप्पाची आरती करावी.
पूजेदरम्यान जाणूनबुजून किंवा नकळत झालेल्या चुकांबद्दल देवाकडे क्षमा मागावी.
गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष... जयजयकाराने गणेशमूर्ती पाण्यात विसर्जित करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Antibiotics Side Effects अँटिबायोटिक्स घेण्याचे 3 मोठे तोटे, अनेक अवयवांसाठी धोकादायक!