rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Dry Fruits Modak Recipe : गणेश चतुर्थीसाठी ड्राय फ्रूट्स मोदक बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घ्या

Dry Fruits Modak Recipe How to Make Dry Fruits Modak Recipe In Marathi
, बुधवार, 20 ऑगस्ट 2025 (13:52 IST)
Dry Fruits Modak Recipe : गणेश चतुर्थीचा सण कैलास पर्वतावरून गणरायाचे आई पार्वतीसह पृथ्वीवर आगमनाचा सण आहे.हा सण बुद्धी आणि समृद्धीचे देवता गणेशाचा जन्म म्हणून साजरा केला जातो.  31 ऑगस्टपासून 10 दिवसांचा गणेशोत्सव सुरू होत आहे.अशा वेळी दहा दिवस बाप्पाला वेगवेगळ्या गोष्टींचा नैवेद्य दाखवला जातो.बाजारात सर्व प्रकारच्या वस्तू सहज उपलब्ध होत असल्या, तरी घरी बनवलेल्या प्रसादाची चव वेगळी असते.बाप्पासाठी ड्रायफ्रुट्सचे मोदक कसे बनवायचे साहित्य आणि कृती जाणून घ्या.
 
साहित्य- 
 
5ते 6 खजूर 
1/2कप भाजलेले बदाम
1/2 कप काजू
1/2कप ड्राय फ्रूट्स 
मॅपल सिरप 
मोदक मोल्ड
 
कृती-
ड्रायफ्रुट्सचे मोदक बनवण्यासाठी ड्रायफ्रुट्स हलके सोनेरी तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. 
 
नंतर खजूरमधील बिया काढून टाका.एक ग्राइंडर घ्या, त्यात सर्व साहित्य एकत्र करा आणि ते कणिक सारखे होईपर्यंत बारीक करा. 
 
 मोदक बनत नाहीत असे वाटत असेल तर आणखी काही खजूर घालून पीठ मळून घ्यावे.
 
ते तयार झाल्यावर, मॅपल सिरपने साच्याला ग्रीस करा आणि या मिश्रणाचा मोठा भाग घ्या आणि साच्यात घाला.एक परिपूर्ण आकार तयार करण्यासाठी सर्व बाजूंनी पुरेसे साहित्य घाला.
 
त्याचप्रमाणे सर्व मोदक बनवा आणि बनवल्यानंतर फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.सुमारे 1 तास ठेवा.फ्रीजमधून मोदक काढा, प्लेटमध्ये ठेवा आणि बाप्पाला नैवेद्य दाखवा. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गणेश स्थापना संपूर्ण विधी मराठीत Ganesha Chaturthi 2025 Puja Vidhi Marathi