Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उपवासाचे उकडीचे मोदक

उपवासाचे उकडीचे मोदक
, बुधवार, 9 सप्टेंबर 2020 (07:46 IST)
पारीसाठी: दोन वाट्या वरईचे पीठ, दोन टी स्पून साजूक तूप किंवा लोणी, चिमूटभर मीठ, दोन वाट्या पाणी.
सारणासाठीः दोन वाट्या खवलेलं नारळ, पाऊण वाटी बारीक चिरलेला खजूर, प्रत्येकी एक टेबल स्पून बेदाणे व काजूचे तुकडे, एक टेस्पून भाजलेली खसखस, दीड वाटी साखर, वेलची पूड.
 
कृती : प्रथम नारळ खवून घ्या. त्यात साखर टाकून सारण शिजवावे. शिजल्यावर त्यात वेलची पूड आणि इतर साहित्य मिसळा. एक जाड बुडाचे पातेले घेऊन त्यात पाणी घाला. थोडे मीठ आणि तूप घाला. पाणी उकळत ठेवा. उकळी आली की त्यात वरई पीठ ठेवा. वाफा आल्यावर भांडं खाली उतरवा. एका ताटाला तुपाच हात लावून त्यात थोडे थोडे पीठ टाकून मळा. चांगले मळल्यावर या पिठाच्या पाऱ्या करून त्यात तयार सारण भरून मोदक करून घ्या. ते मोदक पात्रात साधारण दहा मिनिटे वाफवून घ्या. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Adhik Maas : अधिकमासाविषयी माहिती आणि महत्त्व