केळझराचा एकचक्रा गणेशाची स्थापना प्रत्यक्ष पांडवांनीच केल्याची दंतकथा आहे. आजचे केळझर पुराणकाळात एकचक्रानगरी या नावाने प्रसिद्ध होते. पांडवांनी कुंतीसह या नगरीत अज्ञातवासात असतांना आश्रय घेतला होता. इथेच त्यांनी बकासुराचा वध केला होता. बकासुराच्या वधानंतर पांडवांनी गणपतीचे पूजन केले हाच तो एकचक्रा गणेश. वसिष्ठ ऋषींनीही याची स्थापना आणि आराधना केली असल्याचे या भागात प्रसिद्ध असलेल्या आख्यायिकांवरुन कळते.
केळझरचा एकचक्रा गणेशाचे वैशिष्ट्य म्हणजे इथल्या गणपतीला वैशिष्ट्यपूर्ण रितीने लावण्यात येणारा शेंदूर. शेंदूर लावण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे मुळातच सुंदर असलेली गणपतीची मूर्ती अधिकच सुरेख भासते. केळझर हे वर्धा जिल्ह्यात आहे.