rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Rules of Shivlinga Puja चुकूनही शिवलिंगावर या वस्तू अर्पण करू नका, अन्यथा आर्थिक टंचाईचा सामना करावा लागेल

shivling
, गुरूवार, 22 मे 2025 (15:44 IST)
सनातन धर्मात भगवान शिवाची पूजा करण्याचा नियम आहे. तसेच शास्त्रांमध्ये महादेवांच्या पूजेला विशेष मान आहे. तसेच असे मानले जाते की देवांचे देव महादेव यांची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात गोडवा येतो आणि कुटुंबात सुख-समृद्धी येते. तसेच, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. भगवान शिवाचे भक्त शिवलिंगाला प्रसन्न करण्यासाठी काही वस्तू अर्पण करतात. पण काही गोष्टी अशा आहे, ज्या शिवलिंगाला अर्पण केल्यास व्यक्तीला आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. चला तर मग जाणून घेऊया शिवलिंगावर कोणत्या वस्तू अर्पण करू नयेत.
दूध-जल एकत्र 
शिवलिंगावर दूध जल एकत्रित करून कधीही अर्पण करू नये. एकतर नुसते गाईचे ताजे दूध अर्पण करावे किंवा शुद्ध, स्वच्छ जल अर्पण करावे. घरातील तापवलेले दूध कधीही महादेवांना अर्पण करू नये. महादेवांना शक्य झालया ताजे गाईच्या दुधाचाच अभिषेक करावा. 
 
हळद-कुंकू 
हळद-कुंकू हिंदू धर्मात खूप शुभ मानली जाते. पण शिवलिंगावर चुकूनही हळद-कुंकू अर्पण करू नये. शिवलिंगावर हळद-कुंकू अर्पण केल्याने पूजेचे फळ कमी होऊ शकते असे मानले जाते. हळद-कुंकू ऐवजी तुम्ही स्वच्छ तांदूळ म्हणजेच अक्षदा महादेवांना अर्पण करू शकतात. 
 
तुळशीची पाने
शिवलिंगावर चुकूनही तुळशीची पाने अर्पण करू नयेत. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शिव यांनी माता तुलसीचा पती जालंधरचा वध केला. या कारणास्तव, शिवलिंगावर तुळशीची पाने अर्पण करू नयेत.
 
खंडित तांदूळ
शिवलिंगावर चुकूनही खंडित  म्हणजेच तुटलेले तांदूळ अर्पण करू नये. असे मानले जाते की असे केल्याने भगवान शिव क्रोधित होतात आणि पूजा आणि उपवासाचे पुण्य लाभत नाही नाहीत.
 
नारळ पाणी
शिवलिंगावर कधीही नारळ पाणी अर्पण करू नये. असे मानले जाते की शिवलिंगावर नारळ पाणी अर्पण केल्याने भगवान शिव क्रोधित होऊ शकतात आणि जीवनात आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू शकतो.
ALSO READ: गुरुचरित्र विषयी महत्त्वाची माहिती

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पहिल्या स्त्री-सद्गुरू संत मुक्ताबाई