Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 17 April 2025
webdunia

'दक्षिण कैलास' नावाने ओळखले जाणारे शंभू महादेव शिखर शिंगणापूर

Shambhu Mahadev Shikhar Shingnapur
, मंगळवार, 8 एप्रिल 2025 (07:30 IST)
Maharashtra Tourism : महाराष्ट्रात अनेक लोकांचे कुलदैवत असलेले शिखर शिंगणापूरचे शंभू महादेव हे एक प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे. तसेच येथील टेकडीवर असलेल्या शंभू महादेवाच्या विशाल मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे १८० मीटर उंचीवर चढून जावे लागते. वाटेत 'खडकेश्वर' आणि 'मांगोबा' मंदिरांचे दर्शन देखील घडते. महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापुर गावाबद्दल सांगितले जाते की, याचे निर्माण यादव वंशांचे चक्रवर्ती सिंधनदेव महाराज यांनी केले होते.मंदिराची भिंतीचे बांधकाम दगडाने केलेलं आहे. तसेच मंदिर परिसरात पाच मोठे नंदी आहे. असे सांगतात की, देवगिरीच्या यादव वंशाचेराजा सिंघन येथे येऊन राहिले होते.
ALSO READ: अंबरनाथ शिवमंदिर
शंभू महादेवाचे हे प्राचीन मंदिर सातारा जिल्ह्यात आहे. असे मानले जाते की शिव-पार्वतीचा विवाह चैत्र अष्टमीच्या दिवशी याच ठिकाणी झाला होता. यासाठी येथील गावकरी दरवर्षी शिव-पार्वतीचा विवाह आयोजित करतात. दरवर्षी चैत्र शु. अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा अगदी साग्रसंगीत साजरा केला जातो. पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो. या लग्नासाठी एक भले मोठे ५५० फुट लांब पागोटे विणले जाते. ज्या कुटूंबाला हे काम दिले जाते ते कुटूंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात.

तसेच मंदिरात गर्भगृह, मध्यांतर, सभामंडप आणि नंदी मंडप यांचा समावेश आहे. तसेच हे मंदिर १७ किंवा १८ व्या शतकाच्या आसपास बांधलेले दिसते. येथे शिव-पार्वतीचे स्वयंनिर्मित लिंग आहे. तसेच मंदिर आणि खांबांवर विविध प्रकारच्या शिल्पे बनवण्यात आली आहे. त्यावर पशुपती, विष्णू, कृष्ण, गणेश आणि इतर शिल्पे कोरलेली दिसतात. तसेच शिवरात्रीनिमित्त येथे भव्य मेळा भरतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक त्यांच्या कवडिया घेऊन पूर्ण भक्तीने आणि 'हर-हर महादेव'चा जयघोष करत येतात. तसेच प्राचीन काळापासून हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे.  
ALSO READ: मार्लेश्वर मंदिर संगमेश्वर
मंदिराची पौराणिक आख्यायिका
शिखर शिंगणापूर! पार्वतीने रुसून लपून बसलेल्या शंकराला अचूक हुडकून काढले आणि पुन्हा जाऊ नये म्हणून चक्क दुसर्‍यांदा जिथे लग्न केले ते हे ठिकाण म्हणजे शिखर शिंगणापूर. तसेच स्वयंभू महादेवाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. शंकर पार्वतीच्या विवाहाचे ठिकाण म्हणून शिखर शिंगणापूरला 'दक्षिण कैलास' असे म्हणतात. तसेच इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे मंदिर याच डोंगरावर आहे. मंदिरात जायला जवळपास ४०० पायर्‍या चढून जावे लागते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या घंटा आहे. या घंटापैकी एक घंटा ब्रिटीशांकडून मंदिराला मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे अतिशय महत्त्व होते. इथे असणारा तलाव शिवतीर्थ असे म्हणतात. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांनी १६०० मध्ये बांधला. तसेच या मंदिराच्या पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिरात चार वेळा पुजा केली जाते. तसेच या महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. मग ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो.
ALSO READ: नागेश्वर मंदिर द्वारका
तसेच शंभू महादेव हे मंदिर सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात आहे. पुणे, सातारा, फलटण आणि म्हसवड येथून शिंगणापूरला जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वीर मुरारबाजी चित्रपटाच्या निमित्ताने… अरुण गोविल, दीपिका चिखलिया एकत्र