rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खिशात फक्त ५००० रुपये आहेत? 'या' ३ ठिकाणी तुम्ही फिरून येऊ शकता बजेटमध्ये!

Budget trip destinations Maharashtra
, शुक्रवार, 6 फेब्रुवारी 2026 (07:30 IST)
Maharashtra Tourism : कमी बजेट आहे म्हणून फिरायचा प्लॅन कॅन्सल करण्याची गरज नाही! जर तुमच्या खिशात फक्त ५००० रुपये असतील, तर महाराष्ट्रात अशी काही ठिकाणे आहे जिथे तुम्ही २-३ दिवस आरामात फिरून येऊ शकता. तसेच तुमच्याकडे फक्त ५००० रुपये असतील, तरीही तुम्ही महाराष्ट्रातील निसर्ग, समुद्र आणि ऐतिहासिक वारशाचा आनंद घेऊ शकता. ५००० रुपयांच्या बजेटमध्ये आरामात फिरता येतील अशी ३ सर्वोत्तम ठिकाणे आज आपण पाहणार आहोत. 
बजेटमध्ये बसणारी ही ३ सर्वोत्तम ठिकाणे  
१. लोणावळा आणि खंडाळा 
मुंबई आणि पुण्याच्या जवळ असलेले हे ठिकाण बजेट ट्रिपसाठी उत्तम आहे. तसेच लोणावळ्याला जाण्यासाठी लोकल ट्रेन (पुण्यावरून) किंवा पॅसेंजर ट्रेन वापरा, ज्याचे तिकीट खूप स्वस्त असते. लोणावळ्यात अनेक हॉस्टेल्स किंवा बजेट होमस्टे उपलब्ध आहे. 
काय पाहाल: भुशी डॅम, टायगर पॉईंट, राजमाची पॉईंट आणि कार्ला-भाजा लेणी.
बजेट टीप: खाण्यासाठी टपरीवरील वडापाव, मॅगी किंवा साध्या थाळीचा आनंद घ्या.
२. हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन कोकण 
जर तुम्हाला समुद्रकिनारा आवडत असेल, तर दक्षिण कोकणातील हे ठिकाण बजेटमध्ये बसते. तसेच  एसटी बसने (ST Bus) प्रवास केल्यास खर्च खूप कमी येतो.
कोकणात अनेक 'घरगुती निवास' उपलब्ध आहे, जिथे ५००-८०० रुपयांत राहण्याची सोय होते.
काय पाहाल: हरिहरेश्वर मंदिर, प्रदक्षिणा मार्ग आणि स्वच्छ समुद्रकिनारा.
बजेट टीप: इथले घरगुती 'कोकणी जेवण' स्वस्त आणि चविष्ट असते.
 
३. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर
नाशिक हे शहर बजेट ट्रॅव्हलर्ससाठी नंदनवन आहे. नाशिकमध्ये तुम्हाला अध्यात्म आणि निसर्ग अशा दोन्ही गोष्टी पाहायला मिळतील.रेल्वे किंवा एसटीने नाशिकला पोहोचणे सोपे आणि स्वस्त आहे. पंचवटी किंवा त्र्यंबकेश्वर परिसरात ५०० ते १०० रुपयांत चांगली हॉटेल्स किंवा भक्तनिवास मिळतात. 
काय पाहाल: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, काळाराम मंदिर, सीता गुंफा आणि पांडवलेणी,  सोमेश्वर धबधबा.
बजेट टीप: शहरांतर्गत प्रवासासाठी शेअर रिक्षा किंवा सिटी बसचा वापर करा. नाशिकमध्ये खाण्यासाठी 'मिसळ-पाव' हा उत्तम आणि बजेटमधील पर्याय आहे.
बजेट ट्रिपसाठी खास टिप्स 
ऑफ-सीजनमध्ये फिरा: शनिवार-रविवार सोडून इतर दिवशी गेलात तर राहण्याचा खर्च ५०% कमी होतो. 
सार्वजनिक वाहतूक: खाजगी टॅक्सीऐवजी एसटी बस किंवा लोकल ट्रेनचा वापर करा. ग्रुपमध्ये फिरा: मित्रांसोबत गेल्यावर हॉटेल आणि प्रवासाचा खर्च विभागला जातो.
स्ट्रीट फूड: मोठ्या हॉटेलऐवीजी स्थानिक खानावळीत जेवा. 
ऍडव्हान्स बुकिंग: राहण्याची सोय आधीच ऑनलाईन चेक करून बुक करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

"मिर्झापूर: द मूव्ही" च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर