Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुढी पाडवा शुभेच्छा संदेश Gudi Padwa Wishes 2024

गुढी पाडवा शुभेच्छा संदेश Gudi Padwa Wishes 2024
, मंगळवार, 9 एप्रिल 2024 (05:20 IST)
नवीन पल्लवी वृषलतांची, 
नवीन आशा नववर्षाची, 
चंद्रकोरही नवीन दिसते, 
नवीन घडी ही आनंदाची, 
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
 
पडता दारी पाऊल गुढीचे, 
आनंदी आणि मांगल्यमय होई जग सारे, 
या सणाला करू आनंदाचा जल्लोष 
कारण आले आहे हिंदू नववर्ष
 
पाडव्याची नवी पहाट, 
घेऊन येवा तुमच्या आयुष्यात सुखाची लाट, 
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
 
नव्या संकल्पांनी करूया 
नववर्षाचा शुभारंभ
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
 
हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
नूतन वर्ष आणि गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा
 
नव्या वर्षात आपल्या सर्वांच्या स्वप्नांना मिळो नवी भरारी, 
आयुष्याला लाभो तेजोमयी किनार, हीच सदिच्छा…
गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा
 
चारी दिशांना आनंदाची आहे बहार..
गोड श्रीखंड आणि पुरीचा आहे स्वाद..
दारी सजली आहे रांगोळी..
आसमंतात आहे पतंगाची रांग..
नववर्ष तुम्हा-आम्हाला जावो समाधानाचं
 
नवी सकाळ, 
नवी उमेद, 
नवे संकल्प, 
नवा आनंद..
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला 
गुडी पाडव्याच्या शुभेच्छा
 
नववर्षाची सुरूवात होवो न्यारी..
सुखसमृद्धीने सजो आपली गुढी..
हीच शुभेच्छा आहे आज माझ्या मनी
 
आयुष्याची गोडी वाढवणारा चैत्र आला 
चला करू पुन्हा नव्याने सुरूवात एका चैतन्याच्या अध्यायाला..
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
 
गुढी उभारली असेल आज तुमच्याही दारी, 
चैतन्य आहे आज सर्वदारी…
चला उत्साहाने साजरा करू 
नववर्षाचा हा आनंदोत्सव…
शुभ गुढीपाडवा
 
आशा-आकांक्षांचे बांधून तोरण..
समृद्धीची गुढी उभारू द्वारी
गुढीपाडव्याच्या आणि नववर्ष पर्वाच्या हार्दीक शुभेच्छा
 
नक्षीदार काठाचे रेशमी वस्त्र, 
चांदीचा तांब्या, 
कडुनिंबाची पानं, 
साखरेची माळ, 
अशी उभारूया समृद्धीची गुढी
नववर्षाभिनंदन
 
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणं घेऊन आली सोनेरी दिवस, 
आला नववर्षाचा सण घेऊन आला सोनेरी भरारी
नववर्षाभिनंदन
 
निळ्या आभाळात शोभते उंच गुढी..
नववर्ष आले घेऊन आनंदाची गोडी..
गुढीपाडव्याच्या लाखलाख शुभेच्छा
 
जुन्या आठवणीचं बांधून गाठोडं…
करूया नव्या वर्षाचं स्वागत..
जे घेऊन आलं आहे आनंदाचं पर्व…
उभारूया गुढी परंपरागत…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
 
हिंदू नववर्षाची सुरूवात..
कोकिळा गाते प्रत्येक फांदीवर..
चैत्र मास शुक्ल प्रतिपदेच्या पर्वावर..
आनंदाचा क्षण घेऊन आलं आहे नववर्ष
 
चैतन्यमय झाला सर्व परिसर नव्या पालवीने
गुढीपाडव्याची सुरूवात करू चांगल्या आठवणीने 
 
उभारून गुढी, 
लावू विजयपताका…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 
वर्षामागून वर्ष जाती, 
नवे क्षण नवी नाती घेऊनि येते नवी पहाट तुमच्यासाठी…
  • नववर्षाभिनंदन

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुढीपाडवा हा सण का साजरा करतात ? कथा व संपूर्ण माहिती