चैत्र शुद्ध प्रतिपदा, दिन सोनियाचा,
आनंदे करा स्वागत, प्रथम दिवस वर्षाचा,
सजली, नटली अवघी सृष्टी, स्वागतास त्याच्या,
धनधान्य पिकले गोष्टी समृद्धी च्या,
शुभ शकुनाची नांदी झाली याच दिवशी,
गुढी उभारून करावी, साजरी करावी खुशी,
गोडधोड करून , कर कार्यारंभ रे माणसा,
शुभ मुहूर्तावर आरंभ करावा, हा दिवस आहेच तसा!!