Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 7 April 2025
webdunia

गुढीपाडवा शुभेच्छा Gudi Padwa Wishes in Marathi

Gudi Padwa Wishes
, गुरूवार, 24 मार्च 2022 (16:00 IST)
Gudi Padwa Wishes in Marathi
नवीन पल्लवी वृषलतांची,
नवीन आशा नववर्षाची,
चंद्रकोरही नवीन दिसते,
नवीन घडी ही आनंदाची
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. 
 
नवी सकाळ,
नवी उमेद,
नवे संकल्प,
नवा आनंद..
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गुडी पाडव्याच्या शुभेच्छा
 
नववर्षाची सुरूवात होवो न्यारी..
सुखसमृद्धीने सजो आपली गुढी..
हीच शुभेच्छा आहे आज माझ्या मनी
 
नूतन वर्ष आणि गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा
हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
 
चारी दिशांना आनंदाची आहे बहार..
गोड श्रीखंड आणि पुरीचा आहे स्वाद..
दारी सजली आहे रांगोळी..
आसमंतात आहे पतंगाची रांग..
नववर्ष तुम्हा-आम्हाला जावो समाधानाचं 
 
नवंवर्ष नवा हर्ष…
नवा जोश नवा उत्कर्ष…
नववर्षाभिनंदन.
 
दिवस उगवतो दिवस मावळतो
वर्ष येतं वर्ष जातं
पण प्रेमाचे बंध कायम रहातात,
आपलं नातं असं दरवर्षी वृद्धिंगत व्हावं हीच सदिच्छा,
सर्वांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
 
जुन्या गोष्टी मागे सोडून,
स्वागत करूया नववर्षाचे,
प्रगतीने आणि उत्साहाने भरलेले असो.
तुमचे नववर्ष हे येणारे 
 
पडता दारी पाऊल गुढीचे,
आनंदी आणि मांगल्यमय होई जग सारे,
या सणाला करू आनंदाचा जल्लोष कारण आले आहे हिंदू नववर्ष
 
आली आहे बहार नाचूया गाऊया..
एकत्र येऊन आनंद साजरा करूया..
निसर्गाची किमया अनुभवूया..
एकमेंकाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊया.
 
चैतन्यमय झाला सर्व परिसर नव्या पालवीने
गुढीपाडव्याची सुरूवात करू चांगल्या आठवणीने 
 
नक्षीदार काठाचे रेशमी वस्त्र,
चांदीचा तांब्या,
कडुनिंबाची पानं,
साखरेची माळ,
अशी उभारूया समृद्धीची गुढी...
नववर्षाभिनंदन. 
 
उभारून गुढी, लावू विजयपताका…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष 
सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष
नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा 
 
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणं घेऊन आली सोनेरी दिवस,
आला नववर्षाचा सण घेऊन आला सोनेरी भरारी
नववर्षाभिनंदन.
 
नव्या वर्षात होऊ दे मनाला नव्या विचारांचा स्पर्श,
नवे वर्ष मग आणेल आयुष्यात नवा हर्ष..
नववर्षाभिनंदन.
 
वृक्षांवर सजली आहे नवीन पानांची बहार
हिरवळीने सुंगधित झाली आहे निसर्ग अपरंपार..
चला उभारूया गुढी, आनंदाची आणि समृद्धीची..
 
आई भवानीच्या कृपेने नववर्षात मनासारखे घडू दे…
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
 
नव दुर्गांच्या आगमनाने सजते नववर्ष
गुढी उभारल्याने बहरते हे नववर्ष
कोकिळा म्हणते नववर्षाचा मल्हार
निसर्गाच्या संगीताला येतो आकार
चैत्राच्या सुरूवातीने होतो नवआरंभ
हाच आहे हिंदू नववर्षाचा प्रारंभ
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुढी पाडव्याला कडुलिंबाचं पान खाण्यामागील शास्त्र