Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 8 April 2025
webdunia

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा Women’s Day Wishes

Women’s Day Wishes
, शुक्रवार, 4 मार्च 2022 (13:30 IST)
तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका,
तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा...
 
तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे,
तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा...
 
विधात्याने घडवली सृजनांची सावली,
निसर्गाने भेट दिली आणि घरी आली लेक लाडकी.
महिला दिनाच्या शुभेच्छा...
 
आदिशक्ती तू,
प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी तू,
मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा...
 
विधात्याची निर्मिती तू,
प्रयत्नांची पराकाष्ठा तू,
एक दिवस तरी साजरा कर तुझ्यासाठी तू,
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा...
 
ती आई आहे, ती ताई आहे, 
ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, 
ती मुलगी आहे, ती जन्म आहे, 
ती माया आहे, ती सुरूवात आहे 
आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे. 
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा...
 
स्री म्हणजे वास्तव्य, 
स्री म्हणजे मांगल्य, 
स्री म्हणजे मातृत्व, 
स्री म्हणजे कतृत्व 
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा...
 
नारी हीच शक्ती नराची
नारीच हीच शोभा घराची
तिला द्या आदर, प्रेम, माया
घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा...
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
 
तू भार्या,
तू भगिनी,
तू दुहिता,
प्रत्येक वीराची माता,
तू नवयुगाची प्रेरणा 
या जगताची भाग्यविधाता. 
महिला दिनाच्या शुभेच्छा...
 
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या 
माझ्या आई, बहीण, पत्नी आणि लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा...
 
स्त्री असते एक आई
स्त्री असते एक ताई
स्त्री असते एक पत्नी
स्त्री असते एक मैत्रिण
प्रत्येक भूमिकेतील 'ती'चा करा सन्मान
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा...
 
ती आहे म्हणून हे विश्व आहे
ती आहे म्हणून घराला घरपण आहे
ती आहे म्हणून नात्यांत जिवंतपणा आहे
तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा...
 
मुलीच्या निखळ प्रेमाला सलाम
आईच्या नि:स्वार्थ त्यागाला सलाम
बहिणीच्या प्रेमळ मायेला सलाम
स्त्रीमध्ये दडलेल्या असामान्य स्त्री शक्तीला सलाम
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाथरूममध्ये सेल फोन वापरणे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते