Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

International Women’s Day 2022 : आपल्या आयुष्यात खास असणाऱ्या महिलांना या भेटवस्तू द्या

International Women’s Day 2022 : आपल्या आयुष्यात खास असणाऱ्या महिलांना या भेटवस्तू द्या
, मंगळवार, 1 मार्च 2022 (21:49 IST)
महिलांच्या हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी, आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी एक थीम ठेवली जाते.  यावेळची थीम- 'शाश्वत उद्यासाठी आज लैंगिक समानता आवश्यक अशी आहे'.
 
या विशेष प्रसंगी महिलांचा आदर करणे, त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा देणे, त्यांचे आभार मानणे आणि आपल्या जीवनातील त्यांचे महत्त्व समजून घेत, त्यांचे कौतुकही केले जाते. या दिवशी तुम्ही तुमच्या आई, बहीण, मैत्रिणी, पत्नी किंवा सहकर्मचारी यांसारख्या तुमच्या आयुष्यात उपस्थित असलेल्या खास महिलांना थँक्स म्हणून काही गिफ्टही देऊ शकता. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपण त्यांना  कोणती भेटवस्तू देऊ शकता ते जाणून घ्या.
 
आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 साठी काही भेटवस्तू -
* या खास प्रसंगी, आपण हाताने तयार केलेले ग्रीटिंग कार्ड किंवा बाजारातून खरेदी करून   महिला दिनाच्या शुभेच्छा असे कार्ड किंवा पोस्टर देऊ शकता.
 
* या दिनाच्या निमित्त त्यांना आपण एक छानशी पर्स भेट देऊ शकता.
 
* या दिवशी डायरी आणि पेनही देता येईल.
 
*  त्यांना काय आवडते हे माहिती असल्यास, आपण एक ड्रेस देखील भेट देऊ शकता.
 
* ज्या महिलांना अभ्यासाची आवड आहे त्यांच्यासाठी पुस्तकांपेक्षा चांगला पर्याय असूच शकत नाही.
 
* आपण चित्रांचा कोलाज बनवू शकता आणि त्यांच्या प्रतिभेची प्रशंसा करणारी एक टीप लिहू शकता.
 
* आपण त्यांच्या आवडत्या डिशची ऑर्डर देऊ शकता.
 
* आपण भेटवस्तू खरेदी करू शकत नसल्यास, आपण ऑनलाइन व्हिडिओ बनवून त्यांची प्रशंसा करू शकता.
 
* धन्यवाद म्हणताना, त्यांना ब्रेसलेट किंवा हार देखील दिला जाऊ शकतो.
 
*  जर त्या फिटनेस फ्रीक असतील, तर  त्यांना नवीन योगा मॅट, हेल्थ बँड देखील भेट म्हणून देऊ शकता. 
 
* त्यांना स्वयंपाकाची आवड असेल, तर त्यांना स्वयंपाकघराशी संबंधित कामाच्या वस्तूही भेट देऊ शकता.
 
* जर ते निसर्ग प्रेमी असतील तर त्यांना इनडोअर किंवा आउटडोअर प्लांट भेट देऊ शकता. 
 
भेटवस्तू काहीही असो, त्यांना पुढे जाण्यासाठी नक्कीच प्रेरणा द्या आणि त्यांचे आभार मानायला विसरू नका.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

योग :मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी हा व्यायाम करा, परिणाम लवकरच दिसून येईल