Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Gujarat Election 2022 : दोन टप्प्यात मतदान; 8 डिसेंबर रोजी निकाल

Gujarat Election 2022 : दोन टप्प्यात मतदान; 8 डिसेंबर रोजी निकाल
, गुरूवार, 3 नोव्हेंबर 2022 (12:37 IST)
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची प्रतीक्षा आता संपली आहे. निवडणूक आयोगाने गुरुवारी गुजरात निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. पहिल्या टप्प्याचे मतदान 1 डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 5 डिसेंबरला होणार आहे. त्यानंतर 8 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. 
 
गुजरात निवडणुकीत 2007 पासून डिसेंबरमध्ये निवडणुका होत आहे आणि दोन फेऱ्यांमध्ये मतदान करण्याची पद्धत सुरु आहे. निवडणुकीची घोषणा होताच गुजरातमध्ये अधिसूचना लागू झाली आहे.
 
मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की गुजरात विधानसभेचा कार्यकाळ 18 फेब्रुवारी रोजी संपत आहे. राज्यात 10 ऑक्टोबर 2022 रोजी मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यावेळी गुजरात निवडणुकीत 4.9 कोटी मतदार मतदान करतील. ते म्हणाले की 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत जे तरुण 18 वर्षांचे होतील त्यांनाही मतदानाची संधी दिली जात आहे. एकूण 4.6 लाख मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 
 
मतदानासाठी राज्यात एकूण 51,782 केंद्रे उभारण्यात येणार आहेत. मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असून वृद्धांच्या आरामासाठी वेटिंग एरियाही तयार करण्यात येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

61 व्या वर्षी 88 वे लग्न, प्लेबॉय किंग म्हणून प्रसिद्ध